मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी मुंबईची उपनगरीय रेल्वे वाहतूक आता पूर्ववत झाली आहे. मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेला मेगाब्लॉक आता संपला आहे. छत्रपती शिवाजी महाराज (CSMT) स्थानकातून ३६ तासांचा मेगाब्लॉक संपल्यानंतर पहिली लोकल गाडी रवाना झाली आहे. यानंतर आता मध्य रेल्वेवरची वाहतूक सुरळीत होताना पाहायला मिळेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून ३६ तासांचा, तर ठाणे स्थानकातून ७२ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता, हे दोन्हीही मेगाब्लॉक संपल्याची घोषणा रेल्वेच्या वतीने करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून पहिली धीम्या गतीची लोकल रवाना झाली आहे. त्या मागोमाग आसनगावला जाणारी जलद गतीची गाडी देखील रवाना झाली आहे. मध्य रेल्वे प्रमाणेच हार्बर मार्गावरील पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून पनवेलच्या दिशेने रवाना झाली आहे.
तसेच ठाणे स्थानकात घेण्यात आलेला ६३ तासांचा मेगाब्लॉकही संपला आहे, असं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता प्रवासी सीएसएमटी ते ठाणे, कल्याण, कर्जत, कसारा असा प्रवास करू शकतात.
हे ही वाचा:
निवडणूक झाली, एक्झिट पोल्सही जाहीर आता नरेंद्र मोदी लागले कामाला
आंध्र प्रदेशमध्ये २५ जागांपैकी २१ ते २३ जागांवर भाजपा
अमेरिकेच्या संघात भारताचा आवाज; कॅनडाविरोधात पारडे जड
बंगालची भाजपला साथ; ममतांना धक्का
दुपारी ३.३० वाजता काम संपणार होते आणि त्यानंतर रेल्वे सेवा पूर्ववत होणार होती. मात्र, काम लवकर पूर्ण झाल्याने मेगाब्लॉक लवकर संपवण्यात आला आहे. रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या वेगवान कामामुळे हे काम वेळेआधीच पूर्ण झालं. यादरम्यान, ट्रॅक बाजूला सरकवणं, ओव्हरहेड वायर यंत्रणा उभी करणं, सिग्नलिंग यंत्रणा उभी करणं, पॉइंट्स तयार करणं, क्रॉस ओव्हर तयार करणं अशी महत्त्वाची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचं देखील काम जवळपास पूर्ण झालं आहे.