27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषमध्य रेल्वे मार्गावर रविवार ५ फेब्रुवारीला मेगा ब्लॉक, जाणून घ्या वेळ...

मध्य रेल्वे मार्गावर रविवार ५ फेब्रुवारीला मेगा ब्लॉक, जाणून घ्या वेळ…

Google News Follow

Related

मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या माध्यमातून रविवार ५ फेब्रुवारी २०२३ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक जाहीर केला आहे.

माटुंगा-मुलुंड दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गाने वळवण्यात येतील आणि त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसारच्या स्थानकांवर थांबतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

हे ही वाचा:

बीएमसीचा अर्थसंकल्प थोड्याच वेळात… मुंबईकरांसाठी काय असेल ?

प्रथमच ५० हजार कोटींपेक्षा अधिकचा बीएमसीचा अर्थसंकल्प

पी. चिदंबरम यांच्या पत्नीची संपत्ती ईडीकडून जप्त

ड्रग्स विक्रेत्याचे डोके फिरले केली मित्राचीच हत्या

ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील त्यांच्या वेळापत्रकानुसारच्या स्थानकांवर थांबतील आणि माटुंगा येथे अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

वडाळा रोड-मानखुर्द अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – वांद्रे/गोरेगाव सेवा प्रभावित होणार नाही)  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.५४ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.४० ते दुपारी ३.२८ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वांद्रे/गोरेगाव दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार चालतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.३० पर्यंत ट्रान्सहार्बर/मेन लाइनवरून प्रवास करण्याची परवानगी असेल.

ब्लॉक कालावधीत पनवेल – मानखुर्द मार्गावर विशेष उपनगरीय गाड्या चालविण्यात येतील. प्रवाशांना होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा