कम्युनिस्ट माओवादी आणि फुटीरतावादी अतिरेकी शक्तींना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष जनसुरक्षा विधेयक आणले आहे. या विधेयकाच्या समर्थनार्थ एका सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अधिवक्ता परिषद, समता परिषद मुंबई, देव- देश प्रतिष्ठान आणि विवेक विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी व्याख्यान होणार असून यासाठी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय संविधानिक मूल्य आणि लोकशाही तत्त्वांवर आधारित भारतीय समाजावर आघात करणाऱ्या कम्युनिस्ट माओवादी आणि फुटीरतावादी अतिरेकी शक्तींना पायबंद घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष जनसुरक्षा विधेयक आणले आहे. या विधेयकाच्या समर्थनार्थ एका सभेचे आयोजन मुंबईतील दादर येथे करण्यात आले आहे. शुक्रवार, २८ मार्च रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत ही सभा पार पडेल. विवेक विचार मंचचे मुंबई महानगर संयोजक जयवंत तांबे आणि अधिवक्ता परिषद कोकण प्रांत महामंत्री ऍड. आकाश कोटेचा यांनी लोकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
हे ही वाचा..
क्रिकेटर केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या घरी नन्ही परीचे आगमन
शिवकुमार यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने माफी मागावी
कॅनडा म्हणतोय, भारत सार्वत्रिक निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करेल
यावेळी शहरी माओवाद आणि महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा यावर व्याख्यान होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. डॉ. उदय वारुंजीकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत. तर वक्ते म्हणून डेप्युटी एडिटर, हितवादा ज्येष्ठ पत्रकार, नक्षलवादाचे गाढे अभ्यासक कार्तिक लोखंडे असणार आहेत.
दिनांक: शुक्रवार, २८ मार्च २०२५
स्थळ: राजा शिवाजी विद्यालय, दादर, मुंबई
वेळ: संध्याकाळी ६ ते ८