मीराबाई चानूने रौप्य पदक ‘उचलले’

मीराबाई चानूने रौप्य पदक ‘उचलले’

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने पदकांचे खाते उघडले आहे. भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात भारताला पदक मिळवून दिले आहे. वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात पदक जिंकणारी ती दुसरी भारतीय ठरली आहे.

वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात महिलांच्या ४९ किलो वजनी गटात मीराबाई चानू ही भारताचे प्रतिनिधित्व करत होती. या वेळी पहिल्या फेरीत मिराबाई ८४ किलो आणि ८७ किलोचे वजन यशस्वीरित्या उचलले. पण तिसऱ्या प्रयत्नात ८९ किलो वजन उचलताना तिला अपयश आले. तर दुसरीकडे या फेरीत चायनाची वेटलिफ्टर हाऊ झीहू ९४ किलो वजन उचलत विश्वविक्रम केला.

हे ही वाचा:

लडाखमध्ये उभे राहणार केंद्रीय विश्वविद्यालय

श्रीलंकेने घेतली भारताची फिरकी

संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे कसले पालक मंत्री? हे तर पळपुटे मंत्री!

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी

स्पर्धेच्या पुढच्या फेरीत क्लीन अँड जर्क प्रकारात मीराबाई चानू हिने ११० आणि ११५ किलो वजन लीलया पेलत विक्रम नोंदवला पण तिसऱ्या प्रयत्नात ११७ किलो वजन उचलताना तिला अपयश आले. तर या फेरीतही चीनच्या हाऊ झीहू हिने १०९, ११४ आणि ११६ किलो वजन यशस्वीरित्या उचलत सुवर्णपदक पटकावले. तर मीराबाई चानू हिने रौप्य पदक जिंकले आणि इंडोनेशियाच्या आयसाह विंडी हिने कांस्य पदकावर आपले नाव कोरले.

वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात मीराबाई चानू ही भारताची एकमेव स्पर्धक सहभागी झाली होती. या कामगिरीसाठी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत मीराबाई चानू हिचे अभिनंदन केले आहे. मोदींनी मीराबाई चानू सोबतचा फोटो ट्विट करत म्हटले आहे की, “यापेक्षा आनंददायी सुरवातीची मागणी नाही करू शकत…मीराबाईंचे यश हे भारतीयांना प्रेरणा देणारे आहे.”

Exit mobile version