23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषमीरा भायंदर परिसर धर्मांतराच्या विळख्यात

मीरा भायंदर परिसर धर्मांतराच्या विळख्यात

वर्षभरात बलात्कार, हल्ला, छळ अशा प्रकारच्या १६ नोंदी

Google News Follow

Related

मीरा भायंदर या परिसराला आता जबरदस्तीने धर्मांतर, बलात्कार, हल्ला, छळ अशा प्रकरणांनी वेढले आहे. अलीकडे घडलेल्या १५ प्रकरणावरून हे स्पष्ट होते. पूर्वी या भागात हिंदू लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर होती मात्र अलीकडच्या काही वर्षात मुंब्रा प्रदेश आणि विविध शहरातून मुस्लीम समाजाचे स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे या परिसरात हिंदू समाजावर त्रास होत असे एका सकल हिंदू समाजाच्या एका नेत्यांनी केले आहे.

राज्यात घडलेल्या अनेक घटनांवरून हे लक्षात येते की हिंदू समाजातील महिलांना इस्लामवाद्यांनी अडकवले आहे. लैगिक छळ केला आहे. अहमदनगरच्या राहुरी, पुण्यातील कोंढवा, नाशिक आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात असे प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे. मात्र गेल्या वर्षभरात बहुतांश घटना या मुंबईच्या मीरा रोड परिसरात घडल्याच्या नोंदी आहेत. मीरा रोड आणि भायंदर हा परिसर धर्मांतराचे केंद्र बनले आहे. अलीकडेच प्रभू श्री राम मंदिर उद्घाटनावेळी हिंदुंवर झालेल्या हल्ल्यामुळे आणि हिंदू समाजात जाणूनबुजून अराजकता माजवण्यासाठी हा परिसर चर्चेत राहिला आहे.

हेही वाचा..

५३ वर्षांनंतर विशाखापट्टणम किनाऱ्यावर सापडले पीएनएस गाझीचे अवशेष

धक्कादायक! नवजात बाळ रडू नये म्हणून तोंडाला लावली ‘टेप’!

जयगड किल्ल्याचा बुरुज ढासळतोय

केंद्राकडून शेतकऱ्यांना पुन्हा चर्चेचे आमंत्रण

मीरा रोड, भाईंदर विभागातील अशा गुन्ह्यांची १६ विशेष प्रकरणे आहेत. ज्यात गेल्या वर्षभरात सर्वाधिक प्रकरणांमध्ये इस्लामवाद्यांनी हिंदू पीडितांचे इस्लाममध्ये धर्मांतर केले आहे. एका प्रकरणात २२ वर्षांच्या तरुणीचे धर्मांतर करण्यात आले आहे. तिने दिलेल्या तक्रारीत पती अमीन शेख आणि सासू रेश्मा शेख यांनी तिचा अमानुष छळ केल्याची नोंद आहे. तिच्यावर शारीरिक आणि लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एका प्रकरणात २२ वर्षीय तरुणीचे धर्मांतर करून तिचा शारीरिक आणि लैंगिक छळ करण्यात आल्याची तक्रार तिने आपला पती अमीन शेख आणि सासू रेश्मा शेख यांच्याविरोधात दिली आहे. आणखी एका प्रकरणात १९ मे २०२३ रोजी एका २४ वर्षांच्या तरुणीचे धर्मांतर केल्याची घटना काशिमीरा पोलीस ठाण्यात नोंद आहे. नसीर खान याच्या विरोधात तक्रार नोंद आहे.

तिसऱ्या प्रकरणात एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. मुनावर आणि अजीम मन्सुरी यांनी तिला इस्लाम धर्म स्वीकारण्याची धमकी दिली होती. १५ जून रोजी एका महिलेने भायंदर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चौथ्या प्रकरणात एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी ब्रेन वाश केले होते. नयानगर पोलीस ठाण्यात अशा प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. पाचव्या प्रकरणात भायंदर येथील राजेश जानी नावाच्या एका ५० वर्षांच्या व्यक्तीला इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याची नोंद आहे. सहाव्या प्रकरणात एका १७ वर्षंच्या तरुणावर शाहीन, अबुइद, नुझहात आणि निखत खान यांनी हल्ला केला. आणि १७ वर्षांची तरुणी तिचा भाऊ, चुलत भाऊ यांचे इस्लाममध्ये धर्मांतर केले. यातील अबुइद खानने या मुलीवर अनेकदा लैंगिक अत्याचार केले होते. त्यानंतर पीडीतेने १० ऑगस्ट रोजी मीरा रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

सातव्या प्रकरणात एका हिंदू धर्मियांच्या कार्यक्रमावर मोहम्मद शमी आणि अख्तर यांनी दगडफेक केली होती. २२ जानेवारी रोजी राम मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी हि घटना घडली. आठव्या प्रकरणात एका हिंदू मुलीला प्रेमात अडकवून तिच्यावर लैंगिक अत्याचार आणि पैशासाठी धामकावण्याचा प्रकार केला. शाकीर असे त्याचे नाव असून हा प्रकार १३ जुलै २०२३ रोजी घडला. नवव्या प्रकरणात ८ वी मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर समीर खान याने बलात्कार केल्याची घटना ३० ऑगस्ट २०२२ रोजी घडली होती. दहाव्या प्रकरणात भायंदरमध्ये हमीद, शाहरुख आणि जग्गू खान आणि मिस्तर खान या चौघांनी २३ वर्षीय हिंदू मुलीवर अत्याचार केले. मारहाण केली. आकराव्या प्रकरणात एका १५ वर्षांच्या हिंदू मुलीवर हसनूर नामक व्यक्तीने लैंगिक अत्याचार केले. या घटनेची नोंद नवघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. बाराव्या प्रकरणात फेब्रुवारी २०२३ मध्ये काशिमीरा पोलीस ठाण्यात इम्तियाज चौधरी याने एका महिलेवर बलात्कार केल्याची नोंद १ फेब्रुवारी २०२३ रोजी नोंद आहे. अशा प्रकारची १६ प्रकरणे आहेत.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा