फक्त एक आठवडा; कोविडवरील डीआरडीओचं औषध येतंय

फक्त एक आठवडा; कोविडवरील डीआरडीओचं औषध येतंय

भारतात सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. संपूर्ण देश कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. या लढ्याला बळ देण्यासाठी म्हणून डीआरडीओने विकसित केलेले 2DG हे औषध पुढील आठवड्यापासून बाजारात उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे कोविड विरुद्ध्या लढाईत लवकरच नवे शस्त्र हाती गवसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन अँड अलाईड सायन्स या सहयोगी संस्थेने हे औषध हैदराबाद येथील औषध निर्माण क्षेत्रातील कंपनी डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी यांच्या सहकार्याने तयार केले आहे. या औषधामुळे कोविड-१९ च्या सौम्य अथवा मध्यम लक्षण असलेल्या रुग्णांवर उपचार करता येणार आहेत.

हे ही वाचा:

मुंबईत आज-उद्या लसीकरण बंद ठेवून काय वीकेंड साजरा करायचा आहे का?

ठाकरे सरकारचे मंत्री फक्त बोलतात, आणि भरडली जाते जनता

‘गो फर्स्ट’ झालेल्या ‘गो एअर’चा आयपीओ

अजून चार राफेल भारतात दाखल होणार

2DG या औषधाची पहिली खेप दहा हजार मात्रांची असणार आहे. हे औषध रुग्णांना प्राथमिक उपचारांसोबत सहाय्यकारक म्हणून दिले जाणार आहे.

यापूर्वी घेतलेल्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये हे औषध दिलेल्या रुग्णांचे ऑक्सिजन वरील अवलंबित्व कमी असल्याचा दावा डीआरडीओने केला होता. औषध दिल्यानंतर या रुग्णांना कमी काळासाठी व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले होते. 2DG दिलेल्या रुग्णांची कोविड-१९ मधून बरे होण्याची गती देखील अधिक राहिली होती. डीसीजीआयने 2DG या औषधाच्या कोविड-१९ रुग्णांवरील आपात्कालीन वापरासाठी गेल्या आठवड्यात मंजुरी दिली होती.

Exit mobile version