शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांना कोर्टाने १५ दिवसांची कैद आणि २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या प्रकरणात संजय राऊत दोषी आढळले आहेत. माझगाव कोर्टाने त्यांना दोषी ठरवले आहे. यासंदर्भात किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी आज मुंबईतील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी किरीट सोमय्या यांनी परिवाराला न्याय मिळाल्याचे म्हटले तर आजचा दिवस वेगळ्याचं पहाटेने उजाडला असल्याचे मेधा सोमय्या यांनी म्हटले.
किरीट सोमय्या म्हणाले, संजय राऊत यांना कोर्टाने १५ दिवसांची कैद आणि २५ हजारांचा दंड ठोठावला. ही दंडाची रक्कम मेधा सोमय्या यांना दिली जाणार आहे. १८ मे २०२२ रोजी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना संजय राऊतांविरोधात अब्रुनुकसानीची याचिका दाखल केली होती. या प्रकरणी सुरवातीला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्या दबावामुळे पोलिसांनी काहीही केले नाही. म्हणून न्यायालयात दाद मागितली, त्यांनी दाखल घेतली आणि आज २८ महिन्यानंतर सोमय्या परिवाराला न्याय मिळाला.
मेधा किरीट सोमय्या यांनी देखील यावर भाष्य केले. मेधा सोमय्या म्हणाल्या, आजचा दिवस माझ्यासाठी वेगळीच पहाट घेवून उगवलेला आहे. न्यायालयाने माझी बाजू ऐकून घेवून मला योग्य न्याय दिल्याबद्द्दल समाधान वाटत आहे. समाजामध्ये बेताल वक्तव्य करणारे कोणी असले तर एक शिक्षिका, समाजसेविका म्हणून आम्ही सहन करणार नाही.
हे ही वाचा :
राहुल गांधी भारताचे की ब्रिटनचे नागरिक; उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्न
संजय राऊत यांना १५ दिवसांची कैद, २५ हजारांचा दंड!
४०० कोटींच्या ऑनलाइन गेमिंग घोटाळ्याचा पर्दाफार्श; चीनी नागरिकांची क्रिप्टो खाती गोठवली
किरीट सोमय्या पुढे म्हणाले, संजय राऊत यांनी २०२२ पासून किरीट सोमय्या परिवारावर एकूण २७ आरोप केले, मात्र त्यांनी एकही तक्रार केले नाही, कागदपत्रे सादर केली नाहीत, केवळ भोगस आरोप होते. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आणि यातील एक प्रकरण न्यायालयात घेवून जायचे ठरवले.
युवा प्रतिष्ठानचे उद्घाटन १९८० मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी केले होते. केंद्र सरकारचा एक शौचालय प्रकल्प होता, जे युवा प्रतिष्ठान सारख्या २४ संस्थांना शौचालय बांधण्या संदर्भात मार्गदर्शन करण्याचे काम मिळाले होते. याचे एकंदरीत पेमेंट हे ३.६१ करोड इतके होते. मात्र, संजय राऊत यांनी सर्वांना सांगितले की, युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरीट सोमय्या यांनी हा प्रकल्प पाहणाऱ्या मेधा सोमय्या यांनी १०० कोटी रुपये लाटले. त्यामुळे आम्ही न्यायालयात गेलो, याचिका दाखल केली. या प्रकरणी संजय राऊत यांनी पुराव्याचा एखाद्या कागदाचा तुकडा सादर केला नाही, एक शब्दही बोलले नाहीत. यावरून संजय राऊत हे दोषी आढळले आणि त्यांना शिक्षा झाली, असे किरीट सोमय्या म्हणाले.