नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्यावर मागे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका करत ज्या प्रकल्पामुळे गुजरातचा फायदा झाला, त्या प्रकल्पाला पाटकर यांनी विरोध करत लोकांचे अपरिमित नुकसान केल्याचे म्हटले होते. पंतप्रधान मोदी यांच्या विधानाचे समर्थन करणारा एक लेख टाइम्स ऑफ इंडियामध्ये स्वामिनाथन अंकलेसरिया यांनी लिहिला आहे. मेधा पाटकर यांनी लोकांची दिशाभूल केली आता त्या यासंदर्भात माफी मागतील का, असे अंकलेसरिया यांनी लिहिले आहे. कच्छला नर्मदा नदीचे पाणी आल्यानंतर या सगळ्या आंदोलनामागील वास्तव समोर येऊ लागले आहे, त्यानिमित्ताने अंकलेसरिया यांची निरीक्षणे महत्त्वाची मानली जात आहेत.
स्वामिनाथन म्हणतात की, कच्छला नर्मदेचे पाणी आणणाऱ्या बांधाचे उद्घाटन करताना पंतप्रधान म्हणाले की, मेधा पाटकर आणि त्यांच्या अर्बन नक्षल सहकाऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध केला होता. पण मेधा आणि त्यांचे सहकारी चूक ठरले. मी १९८९मध्ये मेधा पाटकर यांनी आयोजित केलेल्या संवादाला उपस्थित होतो. त्यांचे नर्मदा बचाव आंदोलन, आर्च वाहिनी आणि इतर आंदोलनकर्त्यांनी यासंदर्भातील आयोगाला म्हटले होते की, आदिवासींना जमीन द्या आणि केवळ रोख रक्कम देऊ नका. या आयोगाने त्यांना पाच एकर प्रत्येकी जमीन दिली. शिवाय, रोख रक्कमही वेगळी देण्यात आली. पण मेधा पाटकर यांचे म्हणणे होते की, या आदिवासींचे पुनर्वसन झाले की, ते कर्जात बुडतील, त्यांना पुनर्वसन झालेल्या ठिकाणी नव्या जीवनपद्धतीप्रमाणे जुळवून घेणे शक्य होणार नाही. त्यांची जमीन ते गमावतील आणि नंतर रस्त्यावर येतील. त्यांच्या महिला कदाचित वेश्यावृत्तीकडे वळतील. त्यामुळे हे थांबले पाहिजे.
हे ही वाचा:
हिंदू संस्कृतीबद्दल डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी इंग्रजांना काय सुनावले?
५० फुटवरून झुला खाली आदळला आणि
आशिया कप सुपर फोरमध्ये पाकिस्तानने केली भारताला परतफेड
राहुल गांधी मोजतात पीठ लिटरमध्ये
अंकलेसरिया म्हणतात की, मेधा पाटकर यांचे म्हणणे ऐकल्यानंतर मलाही या प्रकल्पाबद्दल शंका वाटू लागली आणि मी त्याविरोधात लिहिले. मेधा पाटकर असेही म्हणाल्या होत्या की, या प्रकल्पातील कालव्याचा फायदा श्रीमंत शेतकऱ्यांनाच होईल. गरजवंत शेतकऱ्यांना त्याचा लाभच मिळू शकणार नाही. गुजरात राज्य सरकारने तर या प्रकल्पासाठी स्वतः खर्च करायची तयारी दर्शविली. त्यामुळे राज्य दिवाळखोरीत जाऊ शकेल, असेही मेधा पाटकर म्हणाल्या होत्या.
अंकलेसरिया म्हणतात की, आता नर्मदा नदीचे पाणी सौराष्ट्र, कच्छ, राजस्थान इथे पोहोचले आहे. लाखो लोकांना त्याचा फायदा होतो आहे. विलंब झाल्यानंतरही आज हे पाणी तिथच्या पालिका आणि उद्योगांना विकून त्यातून महसूल मिळत आहे.
मी कोलंबिया विद्यापीठाचे नीरज कौशल यांच्यासह एक संशोधन प्रकल्प तयार केला. त्यात आम्ही या प्रकल्पामुळे पुनर्वसन केलेल्या आदिवासींची माहिती मिळविली. त्यात असे लक्षात आले की, पुनर्वसन झालेले आदिवासी उत्तम स्थितीत आहेत. त्यांच्याकडे जमीन आहे, टीव्ही आहे, मोबाईल फोन आहेत, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, पिण्याचे पाणी, वीज या गोष्टी त्यांना उपलब्ध होत आहेत. शिवाय, पुनर्वसन झाल्यानंतरही आदिवासी संस्कृती टिकून आहे.