26 C
Mumbai
Saturday, November 9, 2024
घरविशेषमुंबईतील मैदानांवर पुन्हा होणार क्रिकेटचा जल्लोष

मुंबईतील मैदानांवर पुन्हा होणार क्रिकेटचा जल्लोष

Google News Follow

Related

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) आपल्या क्रिकेट मोसमाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. ९ ऑक्टोबरपासून या स्पर्धांना सुरुवात होईल. तालिम शील्डने याचा श्रीगणेशा होणार आहे. तालिम शील्ड ही मुश्ताक अली टी- २० स्पर्धेसाठी निवड चाचणी असेल. यामध्ये ‘ए’ आणि ‘बी’ गटातील क्लब सहभागी होतील.

क्रिकेट मोसमाला सुरुवात करण्याचा निर्णय शनिवारी (२ ऑक्टोबर) पार पडलेल्या एमसीएच्या अ‍ॅपेक्स कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे आता मुंबईतील मैदानांमध्ये पुन्हा एकदा जल्लोष आणि उत्साह दिसून येणार आहे. शनिवारच्या बैठकीत एमसीएचे प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ यासंबंधीचे करारही बिनविरोध निश्चित करण्यात आले. या करार निश्चितीचा मुद्दा एमसीएचे खजिनदार जगदीश आचरेकर यांनी लावून धरला. त्यांच्या या मुद्द्याला सर्व उपस्थितांनी पाठींबा दर्शवला.

हे ही वाचा:

निविदा मंजूर होण्याआधीच कंत्राटदाराने घेतले खड्डे बुजवायला!

‘कॉर्डेलिया क्रूझचा ड्रग्स प्रकरणाशी काडीमात्र संबंध नाही’

राणीच्या बागेतील पेंग्विन टकाटक; ३० कासवे, १४ प्राणी मात्र दगावले

मेट्रोची कामे मुदतीपूर्वी करा नाहीतर दोन कोटींचा दंड!

भारताचे माजी कसोटीपटू माधव मंत्री यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे त्या निमित्ताने येत्या २९ ऑक्टोबरला एमसीएकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच वेळी सुनील गावस्कर यांच्या हस्ते ‘हॉस्पिटॅलिटी बॉक्स’ आणि ‘दिलीप वेंगसकर नॉर्थ स्टॅन्ड’चे अनावरण होईल. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एमसीए आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार उपस्थित असतील.

९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तालिम शील्ड स्पर्ध्येमध्ये २८ संघ खेळतील. आऊटडोअर आणि इनडोअर कामांसाठी एमसीए क्रिकेट सरसंचालक (जीएम) नेमणार. माजी कसोटीपटू माधव मंत्री जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘सी’ ते ‘जी’ गटांमधील क्लबसाठी लीगचे आयोजन. २९ ऑक्टोबरच्या कार्यक्रमानिमित्त ‘हॉस्पिटॅलिटी बॉक्स’चे अनावरण आणि वानखेडे स्टेडीयममधील नॉर्थ स्टॅन्ड ला दिलीप वेंगसकर यांचे नाव देणार, असे निर्णय बैठकीत घेण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
189,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा