मुंबईतील ऐतिहासिक स्टेडियम म्हणून अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सामन्यांचे साक्षीदार असलेल्या वानखेडे स्टेडियमला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईचे कर्णधार राहिलेल्या माजी खेळाडूंचा सत्कार १२ जानेवारी रोजी याच स्टेडियमवर करण्यात येणार आहे.
भारताचे माजी कर्णधार आणि प्रख्यात क्रिकेट समालोचक सुनील गावस्कर यासाठी मैदानात आले. मुंबई स्पोर्ट्स जर्नालिस्ट असो. आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन यांच्यातील प्रदर्शनीय सामनाही त्यांनी पाहिला.
१९ जानेवारीला या सुवर्णमहोत्सवानिमित भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, सचिव अभय हडपही यावेळी उपस्थित होते.
हे ही वाचा:
जिल्हा प्रशासनाकडून विशाळगडावरील उरुसाला परवानगी नाही!
लॉस एंजेलिसच्या आगीत गॅरी हॉल ज्युनियरची १० ऑलिम्पिक पदके जळून खाक!
महाराष्ट्राच्या मुली उपांत्यपूर्व फेरीत, पण मुले उपउपांत्यपूर्व फेरीतच गारद
केरळमध्ये दलित मुलीचे तब्बल ६४ जणांनी केले शोषण
मुंबई स्पोर्ट्स जर्नालिस्ट असो.विरुद्ध खेळताना मुंबई क्रिकेट असो.ने ७२ धावा केल्या होत्या. त्याआधी दोन्ही संघटनांच्या अध्यक्ष व सचिवांनी या सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून एकमेकांना क्रिकेट कॅप प्रदान केल्या.