मायावतींचे भाचे आता त्यांचे राजकीय उत्तराधिकारी नाहीत!

बसप प्रमुखांनी ट्वीट करून केली घोषणा

मायावतींचे भाचे आता त्यांचे राजकीय उत्तराधिकारी नाहीत!

बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी त्यांचा भाचा आकाश आनंद यांना काही दिवसांपूर्वीच राजकीय उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते. मात्र आता त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. त्यांनी ही भूमिका स्वीकारण्यापूर्वी पुरेशी ‘परिपक्वता’ आणण्याची आवश्यकता आहे, असे मायावतींनी नमूद केले आहे.बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी मंगळवारी त्यांचा भाचा आकाश आनंद यांना राजकीय उत्तराधिकारी आणि पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक पदावरून काढून टाकले.

या संदर्भात मायावतींनी ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. ‘बसप हा एक पक्ष असण्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाभिमानाची, आत्मसन्मानाची आणि सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे, ज्यासाठी काशीरामजी आणि मी आमचे संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे. नवीन पिढीदेखील त्याला गती देण्यासाठी तयार होत आहे. त्याचक्रमाने, पक्षातील इतर लोकांना पदोन्नती देण्यासह मी आकाश आनंद यांना राष्ट्रीय संयोजक आणि आमचे उत्तराधिकारी म्हणून घोषित केले, परंतु पक्ष आणि चळवळीच्या व्यापक हितासाठी ते पूर्ण परिपक्व होईपर्यंत त्यांना या दोन्ही महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांपासून मुक्त केले जात आहे,’ असे त्या म्हणाल्या. तसेच, आकाशचे वडील आनंद कुमार पक्षासोबत त्यांच्या भूमिकेत राहतील, असेही मायावतींनी स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

हमास समर्थक, झाकीर नाईक समर्थक विचारांच्या मुख्याध्यापकांची हकालपट्टी!

खलिस्तान समर्थक परेडमध्ये ‘हिंसेचा उत्सव’;भारताने कॅनडाला सुनावले!

नीरव मोदी याला ब्रिटनच्या न्यायालयाचा धक्का!

बंगाल शिक्षक भरती रद्द करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती!

गेल्या वर्षी १० डिसेंबर रोजी मायावती यांनी २८ वर्षीय आकाश आनंद यांना उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते. लंडनमध्ये एमबीए केलेल्या आनंद यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयकपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
आकाश आनंद अलीकडेच उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर चर्चेत आले होते. जिल्हा प्रशासनाने निवडणूक प्रचारफेरीतील आनंद यांच्या भाषणाची दखल घेतल्यानंतर ही कारवाई झाली. त्यांनी राज्यातील भाजप सरकारची तालिबानशी तुलना केली होती.

Exit mobile version