नव वर्षाची सुरुवात झाली असून देशभरात आनंदाचे वातावरण आहे. अनेकांनी ढोल-ताशे वाजवून, फटाके फोडून नव वर्षाचे स्वागत केले. देशवासी एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, विरोधी पक्षाच्या बड्या नेत्यांनीही नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान मोदींनी ट्वीटकरत देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. “२०२५ च्या शुभेच्छा! हे वर्ष प्रत्येकासाठी नवीन संधी, यश आणि अनंत आनंद घेऊन येवो. सर्वांना आरोग्य आणि समृद्धी लाभो,” असे पंतप्रधान मोदींनी पोस्टमध्ये म्हटलं.
हे ही वाचा :
मणिपूरच्या इंफाळमध्ये अतिरेक्यांकडून गोळीबार आणि बॉम्ब हल्ला!
आत्मसमर्पण केलेल्या वाल्मिक कराडला १४ दिवसांची सीआयडी कोठडी
ऑक्टोबर २०२३ च्या हल्ल्यामागील हमासचा प्रमुख कमांडर ड्रोन हल्ल्यात ठार
पाकिस्तानमध्ये दहशतवाद विरोधी आंदोलनाला हिंसक वळण; पोलिसांचा गोळीबार
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. “सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. २०२५ हे वर्ष सर्वांना आनंदाचे, सुसंवादाचे आणि समृद्धीचे जावो. या निमित्ताने, भारत आणि जगासाठी एक उज्वल, अधिक समावेशक आणि शाश्वत भविष्य घडवण्यासाठी एकत्र काम करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे नुतनीकरण करुया, असे राष्ट्रपतींनी लिहिले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मला आशा आहे की हे वर्ष तुमच्या आयुष्यात नवीन उत्साह, नवीन आनंद आणि आनंद घेऊन येवो, असे राहुल गांधी यांनी म्हटले.