राज्यात विधानसभेची तयारी सुरु असून पक्षांकडून प्रचाराचा बार उडवला जात आहे. आपआपल्या उमेदवारांच्या विजयासाठी पक्षांचे वरिष्ठ नेते राज्यात येवून प्रचार करत आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (८ नोव्हेंबर) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज धुळ्यात सभा पार पडली. सभेला संबोधित करताना महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मी तुमच्यामध्ये धुळ्यात आलो होतो, असे पंतप्रधान मोदींनी जाहीर सभेत सांगितले. महाराष्ट्रात भाजप सरकारसाठी मी तुम्हाला विनंती केली होती. तुम्ही महाराष्ट्रातील १५ वर्षांचे राजकीय चक्र मोडून भाजपला अभूतपूर्व विजय मिळवून दिला. आज मी पुन्हा एकदा धुळ्याच्या भूमीत आलो आहे. मी धुळ्यातूनच महाराष्ट्रातील निवडणूक प्रचाराला सुरुवात करत असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले.
महाविकास आघाडीवर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, महाविकास आघाडीचे लोक महिलांवर अत्याचार करतात. महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही. त्यांना महिलांचे सक्षमीकरण होऊ द्यायचे नाही. लाडकी बहिण योजना हे बंद करतील. सत्ता मिळाल्यास सर्वप्रथम ही योजना बंद पाडू, असा निर्धार काँग्रेस आणि मित्रपक्षांनी केला असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
हे ही वाचा :
मविआच्या गाडीला ना चाके, ना ब्रेक तरीही चालकाच्या सीटवर बसण्यासाठी भांडणे सुरू
तेलंगणात माता पोचम्मा मुर्तीची तोडफोड
भारताने रशियाकडून तेल खरेदी करून जगावर उपकार केले नाहीतर…
मी कोणतीही मुलाखत दिलेली नाही! भुजबळांनी राजदीपच्या पुस्तकातील दावे फेटाळले
ते पुढे म्हणाले, मविआचे लोक योजना बंद करण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेने या आघाडीच्या लोकांपासून सावध राहणे गरजेचे आहे. हे लोक स्त्री शक्ती कधीच बळकट होताना पाहू शकत नाहीत. काँग्रेस आणि मविआचे लोक महिलांना शिव्या देण्यावर उतरलेत, अभद्र भाषेंचा वापर करत आहेत. मविआच्या कृत्याला महाराष्ट्राची महिला माफ करू शकत नाही.
विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारतासाठी आपल्या बहिणी आणि मुलींचे जीवन सुसह्य करणे आणि त्यांना सक्षम करणे खूप महत्वाचेही पंतप्रधान मोदींनी म्हटले. स्त्रिया पुढे गेल्यावर संपूर्ण समाजाची प्रगती झपाट्याने होते. त्यामुळे गेल्या १० वर्षात केंद्र सरकारने महिलांना केंद्रस्थानी ठेवून मोठे निर्णय घेतले असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले.
#WATCH | Dhule, Maharashtra: Addressing a public rally, PM Narendra Modi says, "… The opposition is trying everything to stop the Majhi Ladki Bahan Yojana. Congress ecosystem members have reached the courts against this scheme. They want to discontinue this scheme as soon as… pic.twitter.com/4TiHhj1YnF
— ANI (@ANI) November 8, 2024