मविआचा ८५ चा फॉर्म्युला ठरला, उर्वरित जागांवर मित्र पक्षांसोबत चर्चा!

मविआच्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी दिली माहिती

मविआचा ८५ चा फॉर्म्युला ठरला, उर्वरित जागांवर मित्र पक्षांसोबत चर्चा!

महाविकास आघाडीचे जागावाटप झाले आहे. शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (२३ ऑक्टोबर) मविआच्या  पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शिवसेना उबाठा-८५, राष्ट्रवादी शरद पवार गट-८५ आणि काँग्रेस पक्ष-८५ असा हा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचे सांगितले. तसेच उर्वरित जागांवर मित्र पक्षांसोबत चर्चा करून ठरवण्यात येईल, असेही संजय राऊत यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत संजय राऊत, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अनिल देशमुखसह आदी पक्ष प्रमुख उपस्थित होते.

खासदार संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले, मविआचे सर्व नेते एकत्र येवून शरद पवार यांच्यासोबत बैठक पार पडली. मविआचे जागावाटप अत्यंत सुरळीत पार पडले असून आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आमच्या तिन्ही पक्षांची ८५ म्हणजे एकूण २७० जागांवर सहमती झाली आहे, त्यानुसार आम्ही यादी देखील बनविली आहे.

हे ही वाचा : 

दहशतवाद-फंडिंगशी लढा देत, तरुणांना कट्टरतावादाकडे जाण्यापासून रोखायचय!

काँग्रेसने विधानसभेची जबाबदारी कर्नाटक-तेलंगणामधील लोकांवर दिली, बॉर्डर सील करा, कोटी रुपये येतील!

ब्रिगेडनेही साथ सोडली; नंगा नहाएगा क्या, निचोडेगा क्या?

शाही ईदगाह वादाची प्रकरणे एकत्रित करण्याच्या आदेशाविरुद्धचा मुस्लीम पक्षाचा रिकॉल अर्ज फेटाळला

उर्वरित जागांबाबत मित्र पक्षांसोबत चर्चा करून ठरवल्या जातील. मविआ-२७० आणि उर्वरित मित्रपक्ष असे एकूण-२८८ जागांवर मविआ लढणार आहे. दरम्यान, शिवसेना उबाठा गटाची ६५ उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर झाली. परंतु, या यादीमध्ये काही चुका झाल्या असून त्या दुरुस्त करण्यात येईल, असे संजय राऊत यांनी सांगितले.

Exit mobile version