विवाह नोंदणी वेबसाईटच्या माध्यमातून एका महिला वकिलाला लुटले

पाटणहून मुंबईत येणाऱ्या एका ४९ वर्षीय महिला वकिलांना सोसिअल मीडिया द्वारे लुटण्यात आले.

विवाह नोंदणी वेबसाईटच्या माध्यमातून एका महिला वकिलाला लुटले

पाटणहून मुंबईत येणाऱ्या एका ४९ वर्षीय महिला वकिलांना सोसिअल मीडिया द्वारे लुटण्यात आले. समोरच्या माणसाने त्यांचा विश्वास जिंकून त्यांच्याशी लग्न करायचे आश्वासन देऊन त्या महिला वकिलाचे किमान १ लाख रुपये लुटले.

महिला वकील मुंबई विमानतळावर उतरल्या आणि आणि ती व्यक्ती त्यांना घ्यायला आली. त्याने ३६ हजार रुपये किमतीचा आयपॅड खरेदी केला . त्याच्या खात्यात पूर्ण रक्कम नसल्याचे सांगून त्याने त्या महिलेला ३६ हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी १ लाख रुपये देण्याचा दावा करून त्याने अजून ५८ हजार रुपये मागितले. थोड्या काळानंतर त्याने तिला सोशल मीडियावर ब्लॉक केले आणि तुरुंगात जाण्याची भीती नसल्याचे सांगितले. या फसवणुकीचा विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

हे ही वाचा : 

राहुल गांधी माफी मागा, अन्यथा मुंबईत प्रवेश नाही!

सजा की मजा! तिहार तुरुंगात सत्येंद्र जैन यांनी घेतला मसाजचा आनंद

स्कुल व्हॅन चालकाने विद्यार्थ्यांनीवर अतिप्रसंग करण्याचा केला प्रयत्न

श्रद्धा वालकर, लव्ह जिहाद आणि हिंदू-मुस्लिम विवाह

५ मार्च ते ११ मार्च दरम्यान ह्या महिला वकील मुंबईला ऑपेरा हाऊस परिसरातील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आले असताना ही फसवणूक झाली. “अभय कोठारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरोपीने त्याच्या खऱ्या नावाने स्वतःची ओळख करून दिली आणि त्याच्या कुटुंबाची माहितीही सांगितली. सोसिअल मीडियाच्या माध्यमातून विश्वास संपादन करून फसवणूक करण्याचा विचार त्याला आवडत नसल्याचे त्यानी सांगितले. हे वाक्य ऐकून मी त्याला भेटण्याची विनंती मान्य केली. ५ मे रोजी जेव्हा तो मला स्वीकारण्यासाठी मुंबई विमानतळावर आला तेव्हा माझा त्याच्यावर अजून विश्वास बसला ,” वकिलाने सांगितले. ८ नोव्हेंबर रोजी कोठारीने तिला सांगितले की मला पोलिस केसची भीती नाही आणि हे ऐकून तिने १६ नोव्हेंबरला तक्रार दाखल केली. “कोठारी यांनी खरेदी केलेला आयपॅड माझ्या नावावर असल्याने मी तक्रार दाखल केली,” असे वकिलाने पुढे सांगितले.

Exit mobile version