25 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषरेल्वे अपघात: मथुरा जंक्शन प्लॅटफॉर्मवर चढली रेल्वे गाडी

रेल्वे अपघात: मथुरा जंक्शन प्लॅटफॉर्मवर चढली रेल्वे गाडी

कोणतीही जीवितहानी नाही

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे रेल्वे अपघात झाला आहे. शकूर बस्ती येथून येणाऱ्या ईएमयू ट्रेनला मथुरा जंक्शनवर अपघात झाला. ही ट्रेन अचानक रूळ सोडून प्लॅटफॉर्मवर चढली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. काही काळासाठी रेल्वे स्थानकावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून या अपघाताचा तपास केला जात आहे.

उत्तर प्रदेशातील मथुरा जंक्शनवर मंगळवार, २६ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा रेल्वे अपघात झाला. शकूर बस्तीकडून येणारी एक ईएमयू (EMU) गाडी मथुरा रेल्वे स्थानकाच्या फलाटावर चढली. सुदैवाने अपघात झाला तेव्हा ट्रेनमध्ये प्रवासी उपस्थित नसल्यामुळे मोठी जीवीतहानी टळली. अपघातानंतर रेल्वे स्थानकावर गोंधळ उडाला आणि प्रवासी घाबरून इकडे-तिकडे धावू लागले होते.

मथुरा स्थानकाचे संचालक एसके श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रवासी आधीच ट्रेनमधून उतरले होते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. ही गाडी शकूर बस्ती येथून आली असल्याचं त्यांनी सांगितले. रात्री १० वाजून ४९ मिनिटांनी ट्रेन स्थानकावर आली त्यानंतर सर्व प्रवासी ट्रेनमधून उतरले आणि त्यानंतर ही दुर्घटना घडली. सध्या ट्रेन प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचं काम सुरू आहे. ट्रेन प्लॅटफॉर्मवरुन हटवल्यानंतर या मार्गावरील गाड्या पूर्ववत होतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

एनआयएकडून खलिस्तानी- गँगस्टर्स विरोधात कारवाईचा बडगा

नाझी सैनिकाचा गौरव; कॅनडाच्या लोकसभा अध्यक्षाचा राजीनामा

इराकमध्ये लग्नसोहळ्यात लागलेल्या आगीत १०० ठार

गरवारे क्लब निवडणुकीत शरद पवारांना मोठा धक्का

या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला असून ट्रेनचं इंजिन प्लॅटफॉर्मवर चढलेलं दिसून येत आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्मचे मोठे नुकसान झाले असून ट्रेनचा पुढचा भागही काही प्रमाणात प्रभावित झाल्याचं दिसून येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा