काशीतील ज्ञानवापी मशिदीचा वाद कोर्टात सुरू असतानाच आता मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमीचा वादही ऐरणीवर आला आहे. मथुरा जिल्हा सत्र न्यायालयाने या विषयात महत्त्वपूर्ण निकाल देताना खालच्या न्यायालयातच या खटल्याची सुनावणी करायला परवानगी दिली आहे.
या आधी मथुरा जिल्हा न्यायालयाने ६ मे रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण केली होती. सर्व पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर या प्रकरणातील निकाल न्यायालयाने राखून ठेवला होता. तोच निकाल आता न्यायालयाने गुरुवार, १९ मे रोजी दिला असून कृष्ण जन्मभूमि संदर्भातील याचिका दाखल करून घेतली आहे.
हे ही वाचा:
दर्जेदार वृत्तसंकेस्थळ म्हणून ‘न्यूज डंका’ चा गौरव
राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या, ईडीकडून गुन्हा दाखल
पंजाब पोलिसांनी केला हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश, दोघांना अटक
मनसेच्या पुणे मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्तेच भिडले
या याचिकेमध्ये मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मस्थान परिसरातील शाही इदगाह हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. चारशे वर्षांपूर्वी औरंगजेबाच्या आदेशानुसार मंदिराचा काही भाग तोडून तिथे अनधिकृत कब्जा करण्यात आला आणि शाही इदगाह मशीद बांधण्यात आली असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे हा इदगाह हटविण्यात यावा अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. तर त्याबरोबरच १३.३७ एकर जमिन कृष्ण मंदिराला देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
१ जुलैपासून या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आयोध्यानंतर काशी, मथुरेचा पैशाला काय होणार? याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे.