27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषफिरकीपटूंची भेदक गोलंदाजी; गंभीर- नारायणचा मास्टरस्ट्रोक

फिरकीपटूंची भेदक गोलंदाजी; गंभीर- नारायणचा मास्टरस्ट्रोक

कोलकात्याच्या दबदब्याची ही आहेत कारणे

Google News Follow

Related

तीन वेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेल्या कोलकाता संघासाठी २०२२ आणि २०२३चा हंगाम फारसा चांगला ठरला नव्हता. दोन्ही वेळा संघ प्लेऑफसाठीही पात्र ठरला नव्हता. मात्र संघाने १७ व्या हंगामात शानदार कामगिरी करून गुणतक्त्यात अव्वल स्थान कायम ठेवले आणि या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचणारा हा पहिला संघही ठरला आणि आता तर हैदराबादचा पराभव करून कोलकात्याने १० वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळही संपवला.

सॉल्ट-नारायणची जोडी दमदार

कोलकात्याच्या यशात फिल सॉल्ट आणि सुनील नारायण यांची जोडी महत्त्वाची ठरली. कोलकात्याने जेसन रॉय याच्या जागी सॉल्टची निवड केली. नारायण यांना पुन्हा एकदा सलामीवीर म्हणून पाठवले गेले. नारायण सन २०१७ पासूनच सलामीवाराची भूमिका बजावतो आहे. मात्र गेल्या काही वर्षांत त्यांच्या फलंदाजीच्या क्रमवारीत बदल झाला होता. सॉल्ट आणि नारायणने या हंगामात चांगली कामगिरी केली. कोलकात्याने या हंगामात पॉवरप्लेमध्ये अनेकदा ७० हून अधिक धावा केल्या. नारायण हा कोलकात्यासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. तर, सॉल्ट त्याच्या मागोमागच होता. तर, क्वालिफायर १ आणि अंतिम सामन्यात अर्धशतकीय खेळी खेळणारा वेंकटेश अय्यर याने प्लेऑफमध्ये कोलकात्याच्या विजयात मोठा वाटा उचलला.

रसेलची अष्टपैलू कामगिरी

कोलकात्यासोबत दीर्घकाळापासून असलेल्या आंद्रे रसेलनेही अष्टपैलू खेळाची चमक दाखली. रसेलला सूर गवसणे कोलकात्यासाठी फायदेशीर ठरले. त्याने बॅट आणि चेंडू अशा दोन्ही माध्यमांतून कोलकात्याच्या विजयाला हातभार लावला. रसेलने यष्टीरक्षणातही चमक दाखवली. या हंगामात १५ सामन्यांत १८५च्या धावगतीने त्याने २२२ धावा केल्या. तर, १९ विकेट घेतल्या.

भारताच्या खेळाडूंचेही मोठे योगदान

भारताच्या अंगकृष रघुवंशी आणि रमणदीप सिंहला संघात घेण्यासाठी ४० लाख रुपये खर्च करण्यात आले होते. अंगकृषचा हा पहिला आयपीएल हंगाम होता आणि त्याने १० सामन्यांमध्ये १५५.२४च्या धावगतीने १६३ धावा केल्या. तर, रमणदीप सिंहने २००च्या धावगतीने फलंदाजी केली.

वरुण चक्रवर्ती ठरला कोलकात्याचा सर्वांत यशस्वी गोलंदाज

वरुणने या हंगामात १५ सामन्यांत २१ विकेट घेतल्या. तोच कोलकात्याचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. वरुणसह हर्षित राणा आणि सुनील नारायणची गोलंदाजीही चांगली झाली.

स्टार्कवर विश्वास कायम

या हंगामाच्या सुरुवातीला कोलकात्याने ऑस्ट्रेलियाचा तेज गोलंदाज मिचेल स्टार्क याला आयपीएलच्या लिलावात २४.७५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्यामुळे स्टार्क हा आयपीएलच्या इतिहासातला सर्वांत महागडा खेळाडू ठरला होता. स्टार्क याची सुरुवात फारशी चांगली झाली नसली तरी पहिल्याच स्पेलमध्ये ५० धावा दिल्या होत्या. मात्र संघाच्या व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास कायम ठेवला. स्टार्कने या हंगामात १५ सामन्यांत १७ विकेट घेतल्या.

हे ही वाचा:

मालेगावात माजी महापौरांवर गोळीबार

पुणे अपघात: वेदांतच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल करणाऱ्या ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक

पश्चिम बंगाल-ओडिशाच्या किनाऱ्यावर ‘रेमल चक्रीवादळ’ धडकण्याची शक्यता!

शिक्षिकेचा आवाज काढून सात विद्यार्थिनींवर बलात्कार

गंभीरच्या पुनरागमनामुळे आत्मविश्वास दुणावला

कोलकात्याला स्वतःच्या नेतृत्वाखाली दोनदा आयपीएविजेता करणाऱ्या गौतम गंभीरचे पुन्हा एकदा संघात पुनरागमन झाले. यंदा गंभीर हा कोलकाता संघाचा मेंटॉर होता. गंभीरने पुन्हा एकदा नारायणला सलामीवीर म्हणून पाठवण्याचा निर्णय घेतला. तर, सूर गवसलेल्या स्टार्कवरही विश्वास कायम ठेवला. गंभीरने कर्णधार असताना २०१२ आणि २०१४मध्ये संघाला आयपीएलविजेतेपद मिळवून दिले होते. गंभीरसह संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांचेही मोठे योगदान कोलकात्याच्या विजयामागे आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा