25 C
Mumbai
Sunday, January 5, 2025
घरविशेष'मास्तरांची सावली' साहित्य पुरस्कार जाहीर

‘मास्तरांची सावली’ साहित्य पुरस्कार जाहीर

डॉ प्रदीप आवटे, प्रा सुजाता राऊत,डॉ. योगिता राजकर, सुनील उबाळे, सफरअली इसफ, मधुकर मातोंडकर यांचा समावेश

Google News Follow

Related

मुंबई येथे १ मार्च रोजी कविवर्य नारायण सुर्वे यांच्या स्मरणार्थ ‘सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. स्वामीराज प्रकाशन मुंबई आणि प्रभा प्रकाशन कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाच्या निमित्ताने साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यात पुणे येथील लेखक डॉ.प्रदीप आवटे मुंबई येथील लेखिका प्रा. सुजाता राऊत, वाई येथील कवयित्री डॉ.योगिता राजकर, छ. संभाजीनगर येथील कामगार वर्गातील कवी सुनील उबाळे, सोलापूर येथील कवी सफरअली इसफ आणि सिंधुदुर्ग येथील सांस्कृतिक कार्यकर्ते मधुकर मातोंडकर यांचा समावेश असल्याची माहिती स्वामीराज प्रकाशनचे संचालक रजनीश राणे यांनी दिली

कविवर्य नारायण सुर्वे यांनी मुंबईतील कामगार वर्ग विशेषत: गिरणी कामगार यांना आपल्या कवितेच्या केंद्रस्थानी आणून त्यांची सुखदुःखे मांडली.’कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतांनो माफ करा थोडासा गुन्हा करणार आहे ‘… असं आपल्या कवितेद्वारे म्हणून सुर्वेंनी कष्टकरी – शोषित वर्गाला न्याय देण्याचाही प्रयत्न केला. विद्यापीठाची पायरीही न चढलेल्या सुर्वे यांची कविता मात्र विद्यापीठाची मानबिंदू ठरली. या त्यांच्या ऋणाची आठवण ठेवण्यासाठी स्वामीराज प्रकाशन आणि प्रभा प्रकाशनातर्फे आयोजित सुर्वे मास्तरांचे संमेलन निमित्त ‘मास्तरांची सावली’ या साहित्यिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

हेही वाचा..

४५० कोटींच्या चिट-फंड घोटाळ्याप्रकरणी शुभमन गिलसह चार खेळाडूंना समन्स

बीएसएफकडून बांगलादेशातून घुसखोरीला परवानगी

“दिल्लीचे सरकार खोटे आणि लुट करणारे सरकार”

बांगलादेशी महिला चक्क पश्चिम बंगालमध्ये बनली सरपंच!

यात डॉ. प्रदीप आवटे यांच्या सकाळ प्रकाशन प्रकाशित ‘आणखी एक स्वल्पविराम’ या कुमार कादंबरीला, प्रा. सुजाता राऊत यांच्या सृजन संवाद प्रकाशन प्रकाशित ‘मातीत मिसळण्याची गोष्ट’ या ललित लेख संग्रहाला, डॉ. योगिता राजकर यांच्या सृजन प्रकाशन प्रकाशित ‘बाईपण’ या दीर्घ काव्यसंग्रहाला, कामगार वर्गातील कवी सुनील उबाळे यांच्या गोदा प्रकाशन प्रकाशित ‘उलट्या कडीचं घर’ या काव्यसंग्रहाला आणि मधुकर मातोंडकर यांना त्यांच्या एकूण सांस्कृतिक – साहित्यिक चळवळीतील योगदानासाठी ‘मास्तरांची सावली’ पुरस्कार देण्यात आले असून १ मार्च रोजी मुंबईत होणाऱ्या सुर्वे मास्तरांच्या संमेलनात सदर पुरस्काराने पुरस्कार विजेत्यांना गौरविण्यात येणार असल्याची माहितीही राणे यांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा