ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार

ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दार वर्षी देण्यात येणाऱ्या मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी प्रख्यात संगीतकार प्यारेलाल शर्मा यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तर त्यांच्या व्यतिरिक्त अभिनेते नाना पाटेकर, पत्रकार संजय राऊत यांना देखील या वर्षीचा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. तर त्यांच्याच हस्ते सर्व मान्यवरांना पुरस्कार देण्यात येणार आहेत.

हे ही वाचा:

भाजपाने काढली ठाकरे सरकारची प्रेतयात्रा

कोकणात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी कलगीतुरा!

पवई येथील ह्युन्डाई कार सर्व्हिस सेंटर आगीच्या तडाख्यात

गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका; फडणवीसांचे पत्र

चित्रपट, नाट्यक्षेत्र आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी अभिनेते नाना पाटेकर, अभिनेत्री माला सिन्हा आणि अभिनेते प्रेम चोप्रा यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात येणार आहे. शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनादेखील पत्रकारितेतील विशेष योगदानासाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात येणार आहे. तर मीना खडीकर आणि उषा मंगेशकर यांना संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

तर साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी कवियत्री नीरजा यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासोबतच साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी वागविलासिनी पुरस्कार संतोष आनंद यांना जाहीर झाला आहे. या व्यतिरिक्त डॉ. राजीव शर्मा, डॉ. प्रतीत समदानी, डॉ. अश्विन मेहता, डॉ. निशित शहा, डॉ समीर जोग, आणि डॉ. जनार्दन निबोळकर, यांना आरोग्य क्षेत्रातील सेवेसाठी विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Exit mobile version