ओपनएआय कंपनीच्या सीईओपदावरून हकालपट्टी करण्यात आलेल्या सॅम अल्टमनची पुन्हा घरवापसी होणार आहे.सॅम अल्टमॅन हे सीईओ म्हणून ओपनएआय कंपनीत पुन्हा परतत असल्याची माहिती कंपनीने सोशल मीडियावरून दिली आहे. ब्रेट टेलर (अध्यक्ष), लॅरी सॅमर्स आणि अॅडम डीट एंजेलो यांच्यासह ते पु्न्हा रूजू होणार आहेत.
१७ नोव्हेंबर रोजी, ओपनएआय कंपनीच्या सीईओपदावरून सॅम अल्टमन यांची हकालपट्टी करण्यात आली होती.त्यानंतर सॅम अल्टमन यांना मायक्रोसॉफ्टने आमंत्रित केले होते.मायक्रोसॉफ्टचे आमंत्रण सॅम अल्टमन स्वीकारले देखील होते.तसेच मायक्रोसॉफ्ट कंपनीत काम करण्यासाठी खूप उत्सुक असल्याच अल्टमन यांनी सांगितले होते.मात्र, सॅम अल्टमन आता पुन्हा आपल्या ओपनएआय कंपनीमध्ये सीईओपदावर रुजू होणार आहेत.कंपनीने स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली आहे. कंपनीने म्हटले की, सॅम अल्टमॅन हे सीईओ म्हणून पुन्हा परतत आहेत. ब्रेट टेलर (अध्यक्ष), लॅरी सॅमर्स आणि अॅडम डीट एंजेलो यांच्यासह ते पु्न्हा रूजू होतील. त्याबाबत करार अंतिम टप्प्यात असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
हे ही वाचा:
मराठा राहिला बाजूलाच, मुस्लिम आरक्षणासाठी दोन्ही काँग्रेसची बँटींग…
साडेतीन कोटी खर्च केल्याचा आरोप हास्यास्पद!
हमासने ५० ओलिसांना सोडल्यावरच इस्रायल चार दिवस हल्ले थांबवणार!
हमास नेता याह्या सिनवार आता इस्रायलच्या निशाण्यावर
मिळालेल्या माहितीनुसार, ओपनएआयच्या ५०० हून अधिक कर्मचार्यांनी कंपनीला धमकी दिली होती की, जर कंपनीच्या सर्व संचालकांनी राजीनामा दिला नाही तर ते सर्व राजीनामा देतील. कंपनीच्या कर्मचार्यांनी एका पत्रात म्हटले होते की, ते सर्वजण त्यांचे माजी बॉस म्हणजे सॅम ऑल्टमन यांच्यासोबत मायक्रोसॉफ्टच्या नवीन विभागात सामील होतील. कदाचित असे मानले जाते की, कर्मचाऱ्यांच्या या धमकीमुळेच ओपनएआयला आपला निर्णय मागे घ्यावा लागला आणि सॅम ऑल्टमनला परत बोलावावे लागले.मात्र, एलन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत या संपूर्ण प्रकरणाला प्रसिद्धीसाठीचा स्टंट म्हटले आहे.