भाईंदरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग

भाईंदरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग

मुंबईतील भाईंदर येथे आगीची मोठी घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या भाईंदर येथील आझाद नगर झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. भाईंदर पूर्वेकडील गोल्ड नेस्ट सर्कलजवळील आझाद नगर झोपडपट्टीत आग लागली असून पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून काही जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, आगीच कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सध्या अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या परिसरात धुराचे लोट आकाशात पसरले आहेत.

हे ही वाचा:

काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बसवराज पाटील यांचा भाजपात प्रवेश!

कैद्यांची गर्दी कमी करण्यासाठी कारागृहातील बॅरेक वाढवणार

सरकारला जेव्हा जाग येते…

विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राचे मोठे योगदान दर्शविणारा अर्थसंकल्प

अग्निशमन दलाच्या १५ ते २० गाड्या घटनास्थळी दाखल असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान ही आग विझवत असताना अग्निशमन दलाचे चार जवान जखमी झाले आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या परिसर कुलिंग करण्याचे काम अग्निशमन दलाकडून सुरू आहे. धुराचे लोळ परिसरात मोठ्या प्रमाणात पसरले असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Exit mobile version