मुंबईतील वांद्रे येथील खेरवाडी परिसरात गुरुवारी दुपारी १६ मजली इमारतीच्या तळघरात भीषण आग लागली आहे. आग लागली तेव्हा कनाकिया पॅरिस नावाच्या इमारतीच्या तळघरात किमान पाच वाहने उभी होती.
इमारत रिकामी करण्यात आली असून अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत. अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, “वांद्रे (पूर्व) येथील खेरवाडी पोलीस स्टेशनजवळील कनाकिया इमारतीच्या तळघरात, जिथे विविध भंगार वस्तू ठेवण्यात आल्या होत्या, तिथे दुपारी १.१५ च्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि सुमारे तासाभरानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.” असे त्यांनी सांगितले.
“आगीचे कारण अद्याप समोर आलेले नसून ते शोधण्यासाठी अजून तपास सुरू आहे.” असेही त्यांनी सांगितले. गेल्या शनिवारी, उपनगरीय कांदिवली (पश्चिम) मधील १५ मजली निवासी इमारतीला आग लागली, त्यात एक व्यक्ती ठार आणि दुसरा जखमी झाली होती. असे अधिकाऱ्यांनी आधी सांगितले.
हे ही वाचा:
ऑफिसच्या वेळेनंतर बॉसने फोन करणे आता बेकायदेशीर
WHO: सगळीकडे कोविड केसेस कमी, अपवाद फक्त…
राज ठाकरे म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देऊ पण…
मुनगंटीवारांचा ‘तो’ व्हिडिओ अर्धवट
२२ ऑक्टोबर रोजी मध्य मुंबईतील एका ६१ मजली निवासी इमारतीच्या १९व्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून ३० वर्षीय सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला होता आणि तिथे मोठी आग लागली होती.