तारापूर एमआयडीसी प्लांटमध्ये भीषण आग

तारापूर एमआयडीसी प्लांटमध्ये भीषण आग

पालघर येथील तारापूर एमआयडीसी प्लांटमध्ये मंगळवार, २८ जून रोजी रात्री उशिरा भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. कंपनीत आग लागल्यापासून सलग आठ मोठे स्फोट झाल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून प्रयत्न सुरू आहेत.

बोईसर येथील तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्रीमियर इंटरमीडियरी केमिकल कंपनीला रात्री उशिरा भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या आगीमुळे कंपनीत अनेक स्फोट झाले आहेत. कंपनीत ज्वलनशील पदार्थांचा मोठा साठा असल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीचे स्वरूप गंभीर असून ती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू आहेत.

हे ही वाचा:

सरकारला आली जाग! औरंगाबादचे संभाजीनगर करणार

‘अल्ट न्यूज’चे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर यांना अटक

… आणि जो बायडेन स्वतः पंतप्रधान मोदींना भेटायला आले

शापूरजी पालनजी उद्योगसमुहाचे प्रमुख पद्मभूषण पालनजी मिस्त्री यांचे निधन

पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीमध्ये गेल्या काही काळात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दोन महिन्यांपूर्वीही येथील केमिकल प्लांटला भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या आगीत कंपनीच्या प्रोडक्ट मॅनेजरचा मृत्यू झाला होता.

Exit mobile version