डोंबिवलीच्या एमआयडीसी परिसरात गुरुवार, २३ मे रोजी एका केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आकाशात काळ्या धुराचे लोट पसरले आहेत. घटनास्थळी सहा अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. सुदैवाने या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु, सहा ते सात कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. या आगीनंतर आता या कंपनीच्या शेजारी असलेल्या कंपन्यांना धोका निर्माण झाला आहे.
हे ही वाचा:
तृणमूल नेत्याची मुक्ताफळे; पीओके म्हणजे दुसऱ्या देशाची जमीन
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भिंडेवर १०० वेळा कारवाई
भारताने केलेल्या चाबहार बंदराच्या करारावर तालिबान खुश; पाकिस्तानला पाजणार पाणी
‘युट्यूबर’ बनविण्याचे आश्वासन देऊन हिंदू मुलीला अडकवले जाळ्यात!
एमआयडीसी फेज-२ मधील अंबर कंपनीत दुपारी बॉयलरचा ब्लास्ट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की स्फोटानंतर डोंबिवली परिसरातील अनेक किलोमीटरपर्यंत या स्फोटाचे हादरे जाणवले. शिवाय या परिसरातील अनेक इमारतींच्या काचा फुटल्या. सध्या याठिकाणी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या दाखल झाल्या असून त्यांच्याकडून आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आगीची भीषणात पाहून उल्हासनगर, अंबरनाथ, ठाणे येथून अग्नीशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेत सहा ते सात कामगार जखमी झाल्याची माहिती आहे.