सीरिया-तुर्कीमध्ये महाभयानक भूकंपाचे रौद्ररूप बघायला मिळाले. त्यांतरही तुर्कीला भूकंपाचे धक्के अधून मधून बसत आहेत. भारताच्या काही भागातही भूकंपाचे धक्के बसत आहे. आता हिमालयाच्या भागातही कधीही मोठा भूकंप येऊ शकतो. या भूकंपाची तीव्रता लक्षणीय असू शकते ज्यामुळे परिसरात मोठे नुकसान होऊ शकते. नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञाने हा दावा केला आहे.
हैद्राबाद येथील नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. पूर्णचंद्र राव म्हणतात की पृथ्वीचे कवच अनेक प्लेट्सचे बनलेले आहे आणि या प्लेट्स सातत्याने हालचाली होत आहेत. भारतीय प्लेट्स दरवर्षी पाच सेंटीमीटरपर्यंत सरकत आहेत आणि त्यामुळे हिमालयाचा प्रदेश प्रचंड ताण वाढला आहे. आहे. त्यामुळे हिमालयीन भागात मोठा भूकंप होऊ शकतो. परंतु पायाभूत रचना मजबूत करून जीवित आणि मालमत्तेची हानी कमी केली जाऊ शकते असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
हिमाचल प्रदेश, नेपाळचा पश्चिम भाग आणि उत्तराखंडमध्ये भूकंप होऊ शकतो. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ८ असू शकते, असे डॉ.राव यांनी सांगितले. तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपात एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होण्याचे कारण सरासरी बांधकाम असल्याचे डॉ.राव यांनी सांगितले. आपण भूकंप थांबवू शकत नाही, परंतु शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून भक्कम इमारती बांधल्या पाहिजेत असे मत डॉ. राव यांनी व्यक्त केले.
हे ही वाचा:
नवाब मलिकांना दिलासा नाही, ‘इतक्या’ दिवस वाढला तुरुंगातील मुक्काम
मतांसाठी जितेंद्र आव्हाडांचे मुस्लिमांसमोर लोटांगण
विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारात न्यायालय कसे हस्तक्षेप करू शकेल?
“शिंदे गट’ नाही आता “शिवसेना” म्हणा..
हिमाचल प्रदेश भूकंपांसाठी संवेदनशील आहे. अलिकडच्या काळात या भागात अनेक छोटे-मोठे भूकंप झाले आहेत. त्यामुळे भूगर्भात हालचाली सुरु असल्याचे दिसून येत आहे., ज्यामुळे भविष्यात कोणताही मोठा भूकंप होऊ शकतो. भारतीय आणि युरेशियन प्लेट्सच्या टक्करमुळे हिमालयाचा प्रदेश अस्तित्वात आला. भारतीय प्लेटवरील युरेशियन प्लेटच्या दाबामुळे या भागात जड ऊर्जा निर्माण होत असल्याचे म्हटले जात आहे.