भारताची प्रसिद्ध महिला बॉक्सर मेरी कोम हिचे टोकियो ऑलिम्पिक मधील आव्हान संपुष्टात आले आहे. पण तिचा हा ऑलिम्पिकमधील पराभव हा वादग्रस्त ठरला आहे. मेरी कोम हिने स्वतः तेइतरच्या माध्यमातून ऑलिम्पिकच्या पंचांवर सवाल उपस्थित करत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता ऑलिम्पिकमधील बॉक्सिंग सामन्यांचे नियोजन आणि पंच यांच्यावरून नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे.
गुरुवार, २९ जुलै रोजी भारताची स्टार बॉक्सिंगपटू मेरी कोम ही कोलंबियाच्या इंग्रिट व्हॅलेन्सिया हीचा सामना करण्यासाठी रिंगमध्ये उतरली. राऊंड ऑफ सिक्सटीनच्या या सामन्यात तीन पैकी दोन राऊंड मेरी कोम जिंकली होती. पण तरीही पाच पंचांच्या एकूण गुणांच्या आधारे तिला ३-२ असे पराभूत घोषित करण्यात आले.
मेरी कोमचा हा पराभव तिच्यासकट तिच्या सार्या चाहत्यांसाठी धक्कादायक होता. ‘हा निर्णय दुर्दैवी आहे’ अशी प्रतिक्रिया मेरी कोम हिने सामन्यानंतर दिली होती. तिच्या डोळ्यात अश्रूही दिसत होते. सहा वेळा विश्वविजेता ठरलेल्या मेरी कोम हिला आपला पराभव झाला. याच्यावर विश्वासच बसत नव्हता. कारण सामन्यात ती व्हॅलेन्सिया पेक्षा वरचढ होती.
हे ही वाचा:
शिवशाहीर बाबासाहेबांचा अद्भूत शिवमय प्रवास आता ऑडिओ स्वरूपात
छत्रपती शिवरायांना आदर्श मानणाऱ्या योद्ध्यावर नवी वेब सिरिज
हसरंगाने भारताला रडवले…टी२० मालिकेवर लंकेची मोहर
तेव्हापासूनच या सामन्याच्या पंचावर सवाल उपस्थित होण्यास सुरुवात झाली होती. अशातच आता मेरी कोम हिने एक नवा गौप्यस्फोट केला आहे. सामना सुरू होण्याच्या एक मिनिट अगोदर आपल्याला रिंग ड्रेस बदलण्यास सांगितले असा धक्कादायक खुलासा मेरी कोम हिने केला आहे. तिने यासंदर्भात ट्विट केले आहे. मेरी कोम आपल्या ट्विटमध्ये म्हणते,
मेरी कोम आपल्या ट्विटमध्ये म्हणते, “धक्कादायक… कोणी मला सांगू शकेल का रिंग ड्रेस म्हणजे नेमके काय असते? सामन्याच्या एक मिनिट आधी मला रिंग ड्रेस बदलण्यास सांगितले गेले. कोणी मला समजावू शकेल का?”
Surprising..can anyone explain what will be a ring dress. I was ask to change my ring dress just a minute before my pre qtr bout can anyone explain. @PMOIndia @ianuragthakur @KirenRijiju @iocmedia @Olympics pic.twitter.com/b3nwPXSdl1
— M C Mary Kom OLY (@MangteC) July 30, 2021