गावात वाघ फिरत असल्यामुळे एका जोडप्याचे लग्न बंद घरातच उरकण्याची वेळ आली. बुलढाण्यातील खामगाव येथे ऐन लग्नाच्या मुहूर्तावेळी वाघ आल्याची चर्चा पसरल्याने एका जोडप्याचे लग्न एका बंद खोलीतच लावण्यात आले. एवढेच नव्हे तर वाघाच्या भीतीने जेवणाच्या पंगतीही त्याच खोलीत बसल्या.
गेल्या काही दिवसापासून बुलढाणा शहरात वाघाच्या वास्तवाच्या चर्चा पसरल्या आहेत. आठ दिवसांपासून शहरात कोणत्या न कोणत्या भागात कोणालातरी वाघ दिसत असल्याच्या चर्चा रंगत आहेत.
खामगाव शहरातील केशवनगर भागात समशानभूमी भागात झाडेझुडपे आहेत. या परिसरातील राजपूत यांच्या घरामध्ये सीसीटीव्हीमध्ये घरासमोरून रस्त्यावर वाघ चालत गेल्याचे दृश्य कैद झाले. ही वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यावेळी एका ठिकाणी लग्नाची धामधूम सुरु होती. वाघ दिसल्याच्या बातमीने वन विभागाचे पथकही घटनास्थळी पोहोचले. हे बघून वऱ्हाडाचा एकच गोंधळ उडाला.
हे ही वाचा:
चक्क राहुल गांधी म्हणत आहेत, हिंदूची सत्ता आणा!
पुणे व ठाण्याचे दोन्ही संघ खोखो उपांत्य फेरीत
नोकरी देऊ शकत नसाल तर किमान अशी थट्टा तरी करू नका
मराठी शाळा सरकारला ‘नकोशी’; इंग्रजी माध्यमाच्या शाळांना पायघड्या
अखेर वरिष्ठांनी पुढाकार घेऊन मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत दहा बाय पंधरा फुटाच्या खोलीत जोडप्याचे लग्न लावले. अक्षता पडल्यानंतर तिथेच पंगतीही बसवण्यात आल्या. आणि वऱ्हाड्यांना आसपासच्या शेजाऱ्यांनी आसरा दिला.
मात्र, वनविभागाला काही वाघ गवसला नाही त्यामुळे तो वाघ आहे की बिबट्या हे स्पष्ट झालेले नाही. वाघाच्या दहशतीमुळे बंद खोलीतील या लग्नाची आता एकच चर्चा परिसरात सुरु आहे.