25 C
Mumbai
Monday, January 13, 2025
घरविशेषहा घ्या पुरावा... मारकडवाडीने कुणा एका पक्षाला पाठिंबा दिला नाही!

हा घ्या पुरावा… मारकडवाडीने कुणा एका पक्षाला पाठिंबा दिला नाही!

बावनकुळेंनी शरद पवारांना दाखविले आकडे

Google News Follow

Related

सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी हे गाव सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. गावातील ग्रामस्थांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केल्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. आज शरद पवार यांनी देखील गावाला भेट देत निवडणुक पद्धतीत बदल होणे गरजेचे असल्याचे म्हटले. तसेच बॅलेट पेपरवर मतदान होणार असेल तर आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार असल्याचे उत्तम जानकर म्हणाले. याच दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या चार निवडणुकांची आकडेवारीच जाहीर केली आहे. यावरून मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी कायम वेगवेगळ्या पक्षांना साथ दिल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. तसेच मारकडवाडी गाव हे शरद पवार किंवा उत्तमराव जानकरांची मक्तेदारी नसल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे ट्वीटकरत म्हणाले, शरद पवार साहेब मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी कायम वेगवेगळ्या पक्षांना साथ दिली. तुमच्या माहितीसाठी २०१४, २०१९ आणि २०२४ ची मतांची आकडेवारी देत आहे जरा डोळेउघडून नीट वाचा. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांना ५३३ मतं मिळाली तर महायुतीतील घटकपक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांना ६६४ मतं मिळाली होती. त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या हनुमंत डोळस यांना २९४ मते मिळाली तर अपक्ष अनंत खंडागळे यांना ९७९ मते मिळाली.

हे ही वाचा : 

प्रशासनाने निवडणूक घ्यावी, आम्ही तयार आहोत!

पंजाब-हरियाणा सीमेवरून दिल्लीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमावाला रोखले

राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध होणार निवड!

संभल हिंसाचार: पत्रकार असण्याचा खोटा दावा करणाऱ्या असीम रझा झैदीला अटक

२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रणजितसिंह निंबाळकर यांना ९५६ मतं मिळाली तर राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांना ३९५ मतं मिळाली. मात्र त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीकडून लढलेल्या उत्तमराव जानकर यांना १३४६ मतं मिळाली तर भाजपाकडून लढलेल्या राम सातपुते यांना ३०० मतं मिळाली. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या धैर्यशील मोहिते पाटील यांना १०२१ मतं तर भाजपाच्या रणजितसिंह निंबाळकर यांना ४६६ मतं मिळाली विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उत्तमराव जानकर यांना ८४३ मतं तर भाजपच्या राम सातपुते यांना १००३ मतं मिळाली.

या आकडेवारीवरून स्पष्ट होत की, मारकडवाडी ग्रामस्थांनी कधी राष्ट्रवादीला साथ दिली, कधी अपक्ष तर कधी भाजपाला साथ दिली. त्यामुळे हे गाव कुणा एकाची मक्तेदारी नाही. यावेळी लोकांनी आणि लाडक्या बहिणींनी तुम्हाला नाकारलं. त्यामुळे उगाच भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नका. जरा मारकवाडी येथे झालेल्या मतांची आकडेवारी डोळे उघडून वाचा म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर येईल, असे बावनकुळे यांनी म्हटले.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा