फेसबुकचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मार्क झुकेरबर्ग यांनी भारताचं कौतुक केलं आहे. झुकेरबर्गने डिजिटल पेमेंटमध्ये भारत हा एक जागतिक नेता म्हणून गौरव केला. तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात भारतातील लोक आणि कंपन्या आघाडीवर असल्याचे मत मार्क झुकेरबर्ग यांनी व्यक्त केलं. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात झुकेरबर्ग बोलत होते.
मुंबईत व्हॉट्सअॅपचा एक कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमात मार्क झुकेरबर्ग यांनी WhatsApp ने PayU आणि Razorpay सोबत हातमिळवणी करण्याची घोषणा केली. यामुळं व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI अॅप इत्यादीद्वारे पेमेंट करण्याची सुविधा मिळणार आहे.त्याचबरोबर व्हॉट्सअॅपवर व्यवसायांसाठी व्हेरिफिकेशन सुविधा सुरू केली आहे.या संबंधित अनेक भारतीय कंपन्या त्यांच्याकडे अशा सुविधेची मागणी करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हे ही वाचा:
कॅनडाला भारताशी पंगा भारी पडणार; आर्थिक फटका बसण्याची शक्यता
कॅनडातल्या भारतीयांनो खबरदारी घ्या…भारताकडून आवाहन
अमेरिकेतले संसद सदस्य फेटरमन आले चक्क हाफ पॅन्टमध्ये !
३५ हजाराहून अधिक महिलांकडून अथर्वशीर्षाचे पठण
व्हॉट्सअॅपचे नवीन फीचर ‘फ्लो’
व्हॉट्सअॅपचे नवं- नवीन फीचर येत आहेत.मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात मार्क झुकरबर्गने व्हॉट्सअॅप फ्लोज नावाचे एक नवीन फीचर देखील सादर केले आहे.याचे वैशिष्ट्य कंपन्यांना चॅट कस्टमाइझ आणि वैयक्तिकृत करण्यास अनुमती देईल. झुकेरबर्गने एक उदाहरण देऊन हे वैशिष्ट्य स्पष्ट केले.ते म्हणाले, मजा एखादी बँक असेल, तर या फीचरद्वारे ग्राहकांना बँक खाते उघडण्याची किंवा चॅटद्वारेच तिची इतर सेवा मिळवण्याची सुविधा उपलब्ध करून देऊ शकते. त्याचप्रमाणे विमान कंपन्या तिकीट बुक करण्याची सुविधा देऊ शकतात. यामध्ये ग्राहकांना चॅट न सोडता या सेवेचा लाभ घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितलॆ.