29 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेष'मऱ्हाटी' महाराष्ट्र एम्पोरियममध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या विक्रीला सुरुवात

‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या विक्रीला सुरुवात

प्रदर्शन आणि विक्री २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान सुरू राहणार

Google News Follow

Related

दिल्लीतील प्रसिद्ध ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये महाराष्ट्रातील मूर्तिकारांच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे प्रदर्शन आणि  विक्रीची सुरुवात झाली आहे. या प्रदर्शनात ६ इंच ते ३ फुट उंचीच्या विविध आकारांच्या आठशेहून अधिक गणेशमूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. या मूर्तीची किंमत ५०० रूपयांपासून २६ हजार रूपयांपर्यंत असून हे प्रदर्शन ७ सप्टेंबर २०२४ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

महाराष्ट्रातील मूर्तिकारांच्या कलेला राजधानीत प्रोत्साहन मिळावे, शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती दिल्लीतील गणेशभक्तांपर्यंत पोहोचवणे हे महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उद्दिष्ट आहे. दिल्ली परिक्षेत्रातील ३० गणेश मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो, ज्यामध्ये अमराठी भक्तांचाही मोठा सहभाग असतो. गेल्या २५ वर्षांपासून ठाणे येथील मूर्तिकार मंदार सूर्यकांत शिंदे हे आपल्या उत्कृष्ट शाडूच्या गणेशमूर्तींच्या विक्रीसाठी ‘मऱ्हाटी’ एम्पोरियममध्ये सहभागी होत आहेत. याशिवाय, मुंबईच्या नीता भोसले यांनी मार्बल, फायबर, आणि रेडियमच्या शिवाजी महाराज, गणपती, कृष्ण, विठ्ठल रुक्मिणी यांच्यासह विविध मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत.

हे ही वाचा :

‘ममता बॅनर्जी किम जोंगसारख्या हुकूमशहा’

ममता म्हणतात, बंगाल पेटले तर दिल्लीही पेटेल!

बृजभूषण यांच्यावर कुस्तीपटूंकडून दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यास नकार

पुण्यात २२ वर्षी नौशाद चालवत होता बनावट टेलिफोन एक्स्चेंज

शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर सावित्रीबाई फुले विद्यापीठात दोन दिवसांची राष्ट्रीय परिषद

‘बाबा खडकसिंह मार्गावरील ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये हे प्रदर्शन ७ सप्टेंबर २०२४ पर्यंत सुरु राहणार असून, अधिक माहितीसाठी 011-23363888 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा