बांगलादेशांतील हिंदुंवरील अत्याचाराविरोधात मीरा भाईंदर, घाटकोपर, ठाण्यात मोर्चे!

महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग

बांगलादेशांतील हिंदुंवरील अत्याचाराविरोधात मीरा भाईंदर, घाटकोपर, ठाण्यात मोर्चे!

बांगलादेशातील शेख हसीना सरकार उलथून टाकल्यानंतर अंतरिम सरकारचे पंतप्रधान मुहम्मद युनूस यांनी हिंदू आणि गैर-मुस्लिमांवर कहर सुरू केला आहे. जमात-ए-इस्लामीसारख्या कट्टरवादी संघटनांवरील बंदी हटवून कट्टरवाद्यांना मुक्त हात दिल्यानंतर बांगलादेशात हिंदूंवर सातत्याने हल्ले होत आहेत. गेल्या २ महिन्यांपासून हिंदू मंदिरे आणि वस्त्या जळून खाक झाल्या आहेत. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना घेरून मारले जात आहे. दरम्यान, बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेल्या हल्ल्यांच्या विरोधात रविवारी (८ डिसेंबर) ठाणे, घाटकोपर आणि मीरा भाईंदरमध्ये समस्त हिंदू समाजाच्या वतीने मोर्चे काढण्यात आले.

समस्त हिंदू समाजाने मुंबई उपनगरातील विक्रांत सर्कल विद्याविहार ते निओ वेलकम घाटकोपर पश्चिमेपर्यंत मोर्चा काढला. सायंकाळी निघालेल्या मोर्चात २००० हून अधिक लोक सहभागी झाले होते. यावेळी ३०० हून अधिक महिला आणि ५० मशाल धारक सहभागी झाले होते. मीरा भाईंदर, ठाण्यात देखील हिंदू समाजाकडून मोर्चे काढण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात पुरुष, महिलांचा सहभाग दिसून आला. दरम्यान, ढाका पोलिसांनी खोट्या प्रकरणात अटक केलेल्या चिन्मय कृष्ण दास प्रभूच्या सुटकेची मागणी हिंदूंनी लावून धरली आहे. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे शंकर गायकर यांनी लोकांना संबोधित करताना हिंदूंवर होत असलेल्या जघन्य अपराधांचा आणि क्रौर्याचा निषेध केला.

लोकांशी बोलताना ते म्हणाले, “बांगलादेशातील मुहम्मद युनूस यांचे सरकार गैर-मुस्लिम, विशेषत: हिंदूंना संरक्षण देत नाही. त्यांनी न्यायाची मागणी करणाऱ्या चिन्मय कृष्ण दास प्रभू यांच्यावर देशद्रोहाचा खोटा खटला चालवला आहे. आमची मंदिरे जाळली जात आहेत. आपल्या दैवतांच्या मूर्ती तोडल्या जात आहेत. हिंदूंना वेठीस धरले जात आहे, महिलांची इज्जत लुटली जात आहे, हिंदूंचे राजीनामे जबरदस्तीने घेतले जात आहेत. भारतात घुसलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांनाही हुसकावून लावावे, अशी आमची सरकारकडे मागणी आहे. युनूस सरकारने बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेची हमी द्यावी, आम्ही भारत सरकारकडे हीच मागणी करतो.

हे ही वाचा : 

मोहम्मद युनूस नोबेल पारितोषिकासाठी पात्र नाहीत, पुरस्कार काढून घ्या!

लोकांच्या मनातील मुख्यमंत्र्याची दांडी का उडविली?

हा घ्या पुरावा… मारकडवाडीने कुणा एका पक्षाला पाठिंबा दिला नाही!

पंजाब-हरियाणा सीमेवरून दिल्लीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमावाला रोखले

 

Exit mobile version