हिजबुल्ला प्रमुख हसन नसराल्लाह याचा खात्मा केल्यानंतर जगभरात अनेक ठिकाणी आनंद साजरा केला गेला आहे तर काही देशांमध्ये मातम केला जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नसरल्लाच्या मृत्यूनंतर निषेध मोर्चा काढण्यात आला. काश्मीरमध्ये शेकडो निदर्शक नसराल्लाहचा फोटो घेऊन रस्त्यावर उतरले होते. तसेच इस्रायलच्या विरोधात घोषणाबाजी केली. हिजबुल्लाहच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत केवळ पुरुषच नाही तर मोठ्या संख्येने महिलाही निदर्शनात सहभागी झाल्या होत्या.
दरम्यान, पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनीही लेबनॉन आणि गाझामधील ‘शहीद’ लोकांसोबत “एकता” म्हणून रविवारी नियोजित त्यांची राजकीय मोहीम रद्द केली. लेबनॉन आणि गाझाच्या शहीदांसह, विशेषतः हसन नसरुल्लाह यांच्याशी एकजुटीने माझी उद्याची मोहीम रद्द करत आहे. आम्ही पॅलेस्टाईन आणि लेबनॉनच्या लोकांसोबत या दु:खाच्या आणि अनुकरणीय प्रतिकाराच्या वेळी उभे आहोत, असे त्यांनी ट्विट केले.
हेही वाचा..
व्हेल माशाच्या उल्टीची विक्री करणारे तिघे जाळ्यात, ६ कोटी २० लाख रुपये किमतीची उल्टी जप्त!
नेपाळमध्ये पावसाचा कहर, ११२ लोकांचा मृत्यू, ६८ बेपत्ता आणि २२६ घरे उद्ध्वस्त!
जम्मू-काश्मीरमधील मौलवी म्हणाले, योगी साहेब ‘राम-राम’
अलौकीक प्रतिभेसमोर नतमस्तक व्हा…
याआधी आज इस्रायलने अधिकृतपणे हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसराल्लाहचा या कारवाईत मृत्यू झाल्याची पुष्टी केली. आयडीएफने ट्विट केले, हसन नसराल्लाह यापुढे जगाला दहशत माजवू शकणार नाही. इस्रायली सूत्रांनुसार हिजबुल्लाह दहशतवादी संघटनेचा नेता आणि त्याच्या संस्थापकांपैकी एक हसन नसराल्लाह, हिजबुल्लाहच्या दक्षिण आघाडीचा कमांडर अली कार्की आणि अतिरिक्त हिजबुल्ला कमांडरसह काल बॉम्बस्फोट कारवाईत ठार झाले.
हवाई हल्ल्यांनंतर आयडीएफच्या सूत्रांनी सांगितले होते की स्ट्राइकमध्ये हिजबुल्लाचा नेता हसन नसराल्लाहला लक्ष्य केले गेले होते, जो त्यावेळी कमांड सेंटरमध्ये होता. बेरूतमधील हिजबुल्लाह तळावर इस्रायली हवाई हल्ल्याने लेबनॉनची राजधानी हादरली.