मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन १७ सेप्टेंबर रोजी महाराष्ट्रात साजरा झाला होता. या निमित्ताने पुण्यामध्ये मराठवाडा भूषण प्रशासनिक सेवा पुरस्कार सोहळा पार पडला होता. यावर्षीच्या ‘मराठवाडा भूषण’ पुरस्कराचे मानकरी गणेश रामदासी ठरले आहेत.
बालगंधर्व मंदीर येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाडा समन्वय समितीच्या वतीने आयोजित मराठवाडा भूषण पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अभिनेते सयाजी शिंदे, समन्वयक समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील, उपाध्यक्ष किशोर पिंगळीकर, सचिव दत्ताजी मेहेत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठवाडा समन्वय समितीने प्रशासकीय सेवेत केलेल्या कार्याची दखल घेत गणेश रामदासी यांना पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर गणेश रामदासी यांनी आभार व्यक्त केले आहेत. गणेश रामदासी म्हणाले, दिल्लीत कार्यरत असताना दिल्लीतील महाराष्ट्राचा परिचय, तेथील विविध क्षेत्रात कार्यरत माणसांची माहिती नागरिकांना होण्यासाठी संकलनात्मक माहिती पुस्तकांचे संपादन केले होते. दिल्लीत महाराष्ट्राचे जसे प्रतिनिधित्व दिसते तसे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने पुण्यात मराठवाड्यातील आठही जिल्ह्याचे प्रतिबिंब दिसून येते. प्रत्येक जिल्ह्याची संस्कृती, भाषा, खाद्यसंस्कृती, साहित्य आदी वैशिष्टपूर्ण माहिती याठिकाणी मिळते, अशी माहिती रामदासी यांनी दिली आहे.
पुण्यात मराठवाड्यातील लोक कष्टाची भाकरी शोधत असतात. मराठवाड्यातील सुशिक्षित तरुणाला रोजगार मिळण्यासाठी तसेच उद्योग क्षेत्रात लागणारे कुशल, प्रशिक्षित कामगार उपलब्ध होण्यासाठी मराठवाडा समन्वय समितीने एक ॲप तयार करावे, असे आवाहन गणेश रामदासी यांनी केले आहे.
पुढे गणेश म्हणाले, नागरिकांच्या प्रलंबित अर्जाचा स्थानिक पातळीवर निपटारा करुन त्यांना सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात १७ सप्टेंबरपासून ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. यामध्ये सेवा, कर्तव्य आणि साधना संकल्पनेवर भर देण्यात आला आहे.
हे ही वाचा:
एनआयएच्या कारवाईनंतर पीएफआयकडून केरळमध्ये तोडफोड
बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना करता येणार नोकरी
अमेरिका का म्हणतोय UNSC मध्ये भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व द्या?
… आणि पंतप्रधान मोदींनी परभणीच्या चिमुरडीला पाठवलं पत्र
व्यक्तीला निरोगी आयुष्य जगता यावे यासाठी आगामी २०२३ हे वर्ष जागतिक पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. त्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा या सारख्या पौष्टिक तृणधान्याला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळणार आहे. त्यामुळे व्यक्तीने आपल्या आहारात भाकरी, तृणधान्य समावेश करावा, असे गणेश रामदासी म्हणाले.