“मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या नावावर ३० वर्ष मुंबईत सत्ता राखली, परंतु आज याच मुंबईत मराठी शाळांची स्थिती इतकी वाईट का झाली?” असा सवाल करत भाजपा आमदार अमित साटम यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. २०१०-११ साली मुंबईत असलेल्या ४१३ मराठी शाळांपैकी २०१९-२० सालापर्यंत केवळ २८३ शाळाच शिल्लक आहेत. त्याचबरोबर २०१०-११ साली असलेल्या १०२२१४ विद्यार्थ्यांपैकी आता केवळ ३५१८१ विद्यार्थीच मराठी शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत.
“संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मराठी बाणा जपण्यासाठी १०७ हुतात्मे गेले. शिवसेनेने गेली ३० वर्ष मराठी अस्मितेचा आधार घेत सत्ता राबवली. परंतु मंबई महानगर पालिकेतून मराठी माणूस बाहेर फेकला गेलेला आहे. तशीच अवस्था मराठी शाळांची आणि मराठी भाषेची झालेली दिसून येते. २०१०-११ साली मुंबईत असलेल्या ४१३ मराठी शाळा होत्या. ही संख्या २०१९-२० सालापर्यंत केवळ २८३ शाळाच शिल्लक आहेत. जी आज, केवळ २८३ वर आलेली आहे. २०१०-११ साली मराठी शाळांमधील पटसंख्या १०२२१४ इतकी होती ती आज केवळ ३६ हजारांवर आलेली आहे.” असं अमित साटम म्हणाले.
हे ही वाचा:
एअर इंडियाबाबत कोणताही निर्णय नाही
तुम्ही संपूर्ण शहराला बंदिस्त केले आहे
महाराष्ट्र मॉडेलमध्ये कोविड योद्धे संपावर
“अशीच जर मराठी भाषेची अधोगती सुरु राहिली, तर येत्या ५ वर्षांमध्ये मराठी माणसाला हक्काची एकही मराठी शाळा उरणार नाही. त्यामुळे, ३० वर्ष मुंबई महानगर पालिकेवर ज्यांनी सत्ता राबवली. या मराठीच्या अधोगतीकडे पाहून मला कुसुमाग्रजांच्या २ ओली आठवतात, मराठी भाषा मंत्रालयासमोर भीक मागत उभी आहे.” असा हल्लबोलही अमित साटम यांनी केला आहे.