29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरविशेषअभिनेत्री प्रेमा किरण काळाच्या पडद्याआड

अभिनेत्री प्रेमा किरण काळाच्या पडद्याआड

Google News Follow

Related

मराठी मनोरंजन क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे मुंबईत आज, १ मे रोजी निधन झाले. वयाच्या ६१ व्या वर्षी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रेमा किरण यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

८०- ९० च्या दशकात प्रेमा किरण यांनी अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अशोक सराफ यांच्यासोबतचे त्यांचे चित्रपट जबरदस्त गाजले होते. दे दणादण, धुमधडाका चित्रपटातील त्यांची आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. अर्धांगी, धूमधडाका, दे दणादण, गडबड घोटाळा, सौभाग्यवती सरपंच, माहेरचा आहेर अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या. चित्रपटातील त्यांची गाणी आजही तितकीच लोकांच्या मनात आहेत.

हे ही वाचा:

१ मे ठरणार भाषण दिवस

फलंदाजीतला मोहिनी अवतार!!

स्विगीची आता हवाई डिलिव्हरी

मविआ सरकार रझा अकादमीवर बंदी का घालत नाही?

चित्रपटच नव्हे, तर अनेक मालिकांमधूनही त्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. प्रेमा किरण या अभिनेत्रीच नाही, तर निर्मात्या देखील होत्या. प्रेमा किरण यांनी उतावळा नवरा, थरकाप या चित्रपटांची निर्मितीदेखील केली होती. ‘उतावळा नवरा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली होती. फक्त मराठीच नाही तर गुजराती, भोजपुरी, बंजारा, अवधी या भाषेतील चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा