कोल्हापुरात मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीत उपस्थित होते.योगेश केदार आणि कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्यासमोरच गोंधळ घातला.गोंधळामुळे बैठकीचं वातावरण तापल्यामुळे अजित पवारांनी गोंधळ घालणाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
कोल्हापुरात मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या बैठकीत कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच गोंधळ घातला.मराठा आरक्षणाचा मुद्दा आजून पेटलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज अजूनही मोर्चे काढत आहेत. राज्य सरकारही मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत आहे. अद्याप मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज कोल्हापुरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.मात्र, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून काही कार्यकर्त्यांनी राडा घातला.कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच गोंधळ घातला. योगेश केदार आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातल्याचं समजलं. या गोंधळादरम्यान पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची देखील झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
हे ही वाचा:
लाल किल्ल्यावर सर्वाधिक वेळ भाषण करण्याचे रेकोर्ड नरेंद्र मोदींच्याचं नावे
वृत्तवाहिन्यांच्या ‘बेताल’ बातम्यांमुळे तपासावर परिणाम
मेरे प्यारे परिवारजन… म्हणत पंतप्रधान मोदींनी देशाच्या विकासाचा लेखाजोगा मांडला
देशाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान, त्यांच्या सक्षमीकरणाची गरज
देशभरात ७७ वा स्वातंत्र्यदिवस साजरा करत आहेत.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण केले. त्यानंतर कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा आरक्षणासंदर्भात बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला योगेश केदार आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. ही बैठक कोल्हापुरातील समाजासाठी आहे की राज्यातील मराठा समाजासाठी आहे, असा जाब योगेश केदार आणि कार्यकर्त्यांनी बैठकीदरम्यान अजित पवार यांच्यासोबत विचारला. सोबतच आम्हाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली. कार्यकर्त्यांनी टेबलवर हात आटपून गोंधळ घालायला सुरुवात केली. यावेळी अजित पवारांनी गोंधळ घालणाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.यादरम्यान योगेश केदार आणि कार्यकर्त्यांची पोलिसांसोबतही बाचाबाची झाली. त्यानंतर इथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.
मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीनंतर अजित पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोल्हापुरातील प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांकडून जाणून घेतले. यावेळी विविध शिष्टमंडळांनी भेट घेतली. मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा केली. यावेळी त्याच्यात वाद झाला. सकल मराठा समाजाच्या बैठकीत सर्वांचं ऐकलं. इतर भागातील काही लोक आले होते. त्या शिष्टमंडळाचं कलेक्टर आणि एसपी यांच्या समवेत त्यांचं बोलणं ऐकलं, त्यावर मी ही माझी मत मांडली.
मराठा आरक्षणाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, “मराठा समाजाच्या नागरिकांशी आता समजून घेतलं आहे. मराठा समाजाच्या बाबतीत आम्ही घेतलेला निर्णय हायकोर्टात टिकला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय सुप्रीम कोर्टात टिकला नाही पण मराठा समाजाला मदत होईल याबाबत अनेक निर्णय घेतले आहेत, ते पुढे म्हणाले.