मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्यसरकाराकडून मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याचे ठरवण्यात आले.मराठा समाजात ज्याच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळणार आहे.यासाठी राज्य मागासवर्ग आयोगमार्गात राज्यभर सर्वेक्षण चालू आहे.या सर्वेक्षणासंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षण सर्वेक्षणाला सरकारने मुदतवाढ नाकारली आहे.शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यत संपूर्ण सर्वेक्षण पूर्ण करावं अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे.
मराठा समाजाचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगमार्गात २३ जानेवारी पासून काम चालू आहे.३१ जानेवारी पर्यंत हे सर्वेक्षण होणार होते.परंतु, यामध्ये वाढ करून २ फेब्रुवारी २०२४ करण्यात आली.मात्र, आता या सर्वेक्षणाला मुदतवाढ मिळणार नसल्याने शुक्रवार २ फेब्रुवारी सर्वेक्षणाचा शेवटचा दिवस असणार आहे.
हे ही वाचा:
पोलीस यंत्रणा सतर्क; मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी
‘राकेश रोशन यांचे २० लाख रुपये परत द्यावेत’
लोकसंख्या नियंत्रणासाठी समितीच्या स्थापनेचा प्रस्ताव!
‘कदाचित माझा पाय कापावा लागला असता’
दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या सर्वेक्षणात आतापर्यंत २ कोटी १२ लाखांहून अधिक घरांचा सर्वे पूर्ण झाला आहे.या सर्वेक्षणाचा शुक्रवार अखेरचा दिवस असून या सर्वेक्षणाचा अहवान शनिवारी सुपूर्द करणं अपेक्षित आहे.त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि सचिव यांची ऑनलाईन बैठकही पार पडली. या बैठकीत संपूर्ण सर्वेक्षणाचा आढावा घेण्यात आला आहे. राज्य मागासवर्ग आयोगमार्गात सुरु असलेले सर्वेक्षण शुक्रवार (२ फेब्रुवारी) ११:५९ वाजता संपणार आहे.