बीडमधील गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी मराठा आरक्षणासाठी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.मराठा समाजाच्या आरक्षणासाठी भाजप पक्षाकडून पहिलाच राजीनामा देण्यात आला आहे.याअगोदर शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राजीनामा दिला होता.त्यांनतर आता भाजप पक्षाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे त्यांनी त्यांचा राजीनामा पाठवून दिला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात ठीक-ठिकाणी आंदोलने सुरु आहेत.समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे यांचा उपोषणाचा आज सहावा दिवस आहे.मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी मराठा नेत्यांनी पुढाकार घेऊन राजीनामा द्या अशी मागणी सकल मराठा समाजाकडून करण्यात येत आहे.यानंतर आरक्षणासाठी आमदार-खासदारांच्या राजीनाम्याचं सत्र सध्या सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.याअगोदरच हिंगोलीचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील याना मराठा आंदोलन कर्त्यांनी अडवत त्यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली.
हे ही वाचा:
आंध्र प्रदेशात दोन रेल्वेगाड्या धडकल्या, १४ ठार
केरळमधील बॉम्बस्फोटमालिकेचा २० सदस्य करणार तपास
आमदार अपात्रतेप्रकरणी दोन महिन्यांत निकाल द्या!
नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न!
त्यानंतर हेमंत पाटील यांनी लगेच आपला राजीनामा लिहून त्यांच्या हातात दिला.यानंतर आता बीड जिल्ह्यातील गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे त्यांनी त्यांचा राजीनामा पाठवून दिला.आमदार लक्ष्मण पवार यांनी राजीनाम्याच्या पत्रात म्हटले आहे की, ‘महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलिंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र असून मराठा आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.’ मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी भाजप कडून पहिलाच राजीनामा आला आहे.
राजीनामे देण्यापेक्षा एकत्र या, जरांगे पाटील
हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिल्या नंतर मराठा आरक्षणासाठी भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी देखील आपला राजीनामा दिला. यावर आमदार आणि खासदारांना राजीनामा न देण्याचं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.ते म्हणाले, राजीनामे देऊन आपलीच संख्या कमी होईल. राजीनामे देण्या पेक्षा एकत्र या. मुंबईत बसून सरकार ला वेठीस धरा. राजीनामे देऊ नका. सगळ्यांनी मुंबईकडे कूच करा. समाज तुम्हाला विसरणार नसल्याचे ते म्हणाले.