मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या गावात आज पत्रकार परिषद घेतली.२४ ऑक्टोबरपर्यंत मराठा आरक्षण जाहीर न केल्यास २५ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण पुन्हा सुरू करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. या उपोषणात कोणतेही उपचार घेणार नाही तसेच पाणीदेखील पिणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील धडपडत आहेत.मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखला देण्याची मागणी ते करत आहेत.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आम्ही पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक नेत्यांनी सांगितले.मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी थोड्या कालावधीची गरज असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. मात्र, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या गावात आज मराठा आरक्षण संदर्भात आज पत्रकार परिषद घेतली. २४ ऑक्टोबरपर्यंत मराठा आरक्षण जाहीर न केल्यास २५ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण पुन्हा सुरू करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.मराठा आरक्षण मिळावे यासाठी कोणीही आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे देखील जरांगे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.तसेच मंत्री, आमदार, खासदार, प्रशासनातील लोकांना गावबंदी करण्यात येणार असल्याची घोषणा जरांगे यांनी केली.
हे ही वाचा:
पुण्यात विमान कोसळलं, तीन जण जखमी!
बॉलिवूड अभिनेता दलीप ताहिलला दोन महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा!
मसूद अझहरचा निकटवर्तीय दहशतवादी दाऊद मलिकला ठोकले!
आईमुळे बलात्कारी पुत्राला २० वर्षे सक्तमजुरी!
पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे यांनी म्हटले की, राज्यातील मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याला गावात येऊ दिले जाणार नाही. प्रत्येक सर्कलमध्ये साखळी उपोषण करण्यात येणार आहे. सर्कल मधील सर्व गावाच्यावतीने एकाच ठिकाणी ताकदीने साखळी उपोषण सुरू केले जाणार आहेत. पुढे २८ ऑक्टोबरपासून त्याच साखळी उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात होणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली. जनतेच्या मुळावर पाय देणे याला विकास म्हणत नाही, आमच्या मुंडक्यावर पाय देऊन कोणाला मोठं करायचे आहे असा सवाल त्यांनी केला.
प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात, प्रचंड संख्येने समाजाने एकत्रित येऊन कँडल मार्च काढण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी या वेळी केले. तूर्तास आंदोलनाची ही दिशा असून आंदोलनसुरू झाल्यानंतर २५ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा आंदोलनाची नवी दिशा सांगितली जाईल असेही त्यांनी म्हटले.