छत्रपती संभाजी नगरातील मागील तीन दिवसांपासून मध्यवर्ती बस स्थानकावर बसेस जागेवरच उभ्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत महामंडळाला एकूण दिड कोटीचा तोटा झाला आहे.मराठा आरक्षणामुळे राज्यातील ठिकठिकाणी दगडफेकीचे, जाळपोळच्या घटना घडत आहेत.मागील काही दिवसांपासून एसटी बस वर काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याने महामंडळाकडून एसटी बस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला मराठवाड्यातील अनेक भागात हिंसक वळण लागले आहे. ज्यात एसटी परिवहन मंडळाच्या बसेसवर देखील दगडफेक करण्यात आली. त्यामुळे परिवहन मंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा सर्व परिस्थितीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एसटी बसेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून शहरातील मध्यवर्ती बस स्थानकावर बसेस जागेवरच उभ्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत महामंडळाला दिड कोटीचा तोटा झाला आहे.
हे ही वाचा:
महुआ मोईत्रा यांच्या संसद खात्यावरून दुबईतून ४७ वेळा लॉग इन
‘गाझामधील हल्ला म्हणजे तालिबानी मानसिकतेला चिरडणे’
२० लाख अफगाणी नागरिकांना पाकिस्तान परत पाठवणार
कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसालाच जमावाने घेरून केली मारहाण
गेल्या दोन दिवसापूर्वी बीडमध्ये ५० पेक्षा अधिक बस गाड्यांची तोडफोड करण्यात आली. या तोडफोडीत छत्रपती संभाजीनगरच्या दहा बसेसचा समावेश आहे. या सर्व बसेसचे जवळपास दहा लाखाचे नुकसान झाले. तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना पाहता छत्रपती संभाजीनगरच्या परिवहन विभागाने बसेस बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सोमवारी दुपारपासून जिल्ह्यातील आठही आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. त्यामुळे महामंडळाला दिड कोटीचा तोटा सहन करावा लागला आहे.
संभाजीनगर आगाराच्या रोजच्या २२२ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर इतर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेस पाहता एकूण १४०० रोजच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तोडफोड आणि बस बंद ठेवण्याचा निर्णय पाहता आतापर्यंत संभाजीनगर परिवहन विभागाचे दिड कोटीचे नुकसान झाले आहे.शहरातील एसटी बंद झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहे.तसेच बुधवारपासून छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागात इंटरनेट पूर्णपणे बंद आहे. तर ३ नोव्हेंबरपर्यंत इंटरनेट बंद असणार आहे.