मराठा आंदोलक ऋषिकेश बेदरेला जामीन मंजूर!

एक लाख रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर,मात्र जालना आणि बीडला जाता येणार नाही

मराठा आंदोलक ऋषिकेश बेदरेला जामीन मंजूर!

अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणातील आरोपी ऋषिकेश बेदरे याला मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.एक लाख रुपयाच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, जालना आणि बीडला न जाण्याच्या अटीवर कोर्टाने बेदरेला जामीन मंजूर केला आहे.

अंतरवाली सराटी येथील दगडफेक व जाळपोळ प्रकरणी गोंदी पोलीस स्टेशनमध्ये ऋषिकेश बेद्रे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गावठी पिस्टल प्रकरणी ही अटक केली होती. सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ॲड. विशाल कदम यांच्या मार्फत हायकोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. गुरुवारी न्या. एस. व्ही चपळगावकर यांच्या खंडपीठ समोर वरिष्ठ विधीज्ञ व्हीं. डी. सपकाळ यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून खंडपीठाने जामीन दिला आहे.

हे ही वाचा:

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी शिफारस करणार

‘मागेल त्याला शेततळे’ योजना अधिक व्यापक करणार

पश्चिम बंगालमधील शिल्पकारांनी साकारली अयोध्येच्या राम लल्लाची मूर्ती

मथुरेतील शाही ईदगाह मशिदीच्या जागेचा सर्व्हे करण्याचे आदेश

अंतरवाली सराटी येथील दगडफेक व जाळपोळ प्रकरणात ऋषिकेश बेदरे मुख्य आरोपी होता. त्यांच्याकडे गावठी कट्टा व काडतुसे सापडल्याचा आरोप देखील करण्यात आला होता.अंबड सत्र न्यायालयाने अर्ज भेटल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ ॲड. विशाल कदम यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जावर न्या. एस. व्ही चपळगावकर यांच्या खंडपीठासमोर वरिष्ठ विधीज्ञ व्हि. डी सपकाळ यांनी युक्तिवाद केला.अखेर ऋषिकेश बेदरेला छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.एक लाख रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.कोर्टाच्या अटीनुसार बेदरेला जालना आणि बीडला जाता येणार नाही.

 

Exit mobile version