गडचिरोलीत नववर्षाची नवी पहाट; ताराक्कासह ११ कट्टर माओवादी शरण!

मुख्यमंत्री फडणवीसांनी केले स्वागत

गडचिरोलीत नववर्षाची नवी पहाट;  ताराक्कासह ११ कट्टर माओवादी शरण!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज (१ जानेवारी) गडचिरोली दौरा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी वांगेतुरी-गर्देवाडा-गट्टा-अहेरी बससेवेचा शुभारंभ केला. या भागात पोहोचणारे मुख्यमंत्री फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री आहेत. पहिल्यांदाच या भागात पक्क्या रस्त्याचे बांधकाम झाले, पहिल्यांदाच या भागात बससेवा सुरु झाली. या बससेवेच्या पहिल्या फेरीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवादाविरोधात लढताना जिवाची पर्वा न करणाऱ्या गडचिरोली पोलीस दल, सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि सी-६० जवानांशी संवाद साधला. पेनगुंडा येथे पोलीस टेंट व्यवस्थेची पाहणी केली आणि आढावा घेतला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जनजागरण मेळाव्यामध्ये लाडक्या बहिणीने पारंपरिक टोप घालत स्वागत केले. विशेष म्हणजे, यावेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ११ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यावेळी त्यांना भारताच्या संविधानाच्या पुस्तिकेचे वाटप केले. आत्मसमर्पणानंतर त्यांना पुनर्वसनाकरिता शासनाकडून एकत्रितरित्या ८६.५ लाख रुपये बक्षीस स्वरुपात देण्यात आले.

आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये विमलाचंद्र सिडम उर्फ ताराक्काचा समावेश आहे. विमलाचंद्र सेडम उर्फ ताराक्का या ३८ वर्ष माओवादी संघटनेत कार्यकरत होत्या. १९८६ मध्ये त्या संघटनेमध्ये सामील झाल्या होत्या. शासनाने यांच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आत्मसमर्पणानंतर शासनाकडून त्यांना १५ लाख रुपये बक्षीस मिळणार आहे. ११ नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणामध्ये ८ महिलां आणि ३ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये एका जोडप्याचा समावेश आहे. एकत्रितरित्या ११ जणांनी आत्मसमर्पण केल्यामुळे १० लाख रुपये अतिरिक्त बक्षीस म्हणून मिळणार आहे.

हे ही वाचा : 

अमेरिकेत नववर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत ट्रक घुसवून गोळीबार

द बीड स्टोरी…

जबलपूरमध्ये कुस्तीच्या आखाड्यातील हनुमानाच्या मूर्तीची विटंबना

मातोश्रीवर संजय राऊत यांना बुकलले? सोशल मीडियावर गरमागरम चर्चा

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, उत्तर गडचिरोली नक्षलद्यांपासून मुक्त झाली असून लवकरच दक्षिण गडचिरोली मुक्त होईल. आत्मसमर्पणामुळे नक्षलवाद्यांचे कंबर मोडण्याचे काम सुरु झाले आहे. येत्या काळात नक्षलवाद महाराष्ट्रातून हद्दपार झालेला आणि संपलेला दिसेल. नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी राज्याच्या सीमा उरलेल्या नाहीत, इतर राज्याच्या सीमा पार करून नक्षलवाद्यांविरोधात मोहीम राबवू शकतो. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे यासाठी आभार.

आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना आश्वासन देतो कि तुम्ही सर्व मार्ग भटकलेले होतात. आता सन्मार्गावर आलेले आहात. इतरांनाही संदेश द्या कि खरा मार्ग हा भारताच्या संविधानाचा मार्ग आहे. या मार्गानेच विकास होवू शकतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Exit mobile version