ज्यांनी बंदुकीच्या जोरावर दहशत निर्माण केली, शाळा पाडल्या, सरकारी योजनांना विरोध केला, त्यातील काहींनी आता शरण आल्यानंतर समाजकार्याला लागले आहेत. दंतेवाडात अशी एक घटना घडली.
सहा वर्षांपूर्वी बंडखोरीतून उद्ध्वस्त केलेल्या दंतेवाडा येथील शाळेचे संपूर्ण बांधकाम शरणागती पत्करलेल्या याच माओवाद्यांनी पूर्ण केले. सोमवारी या शाळेत २७ विद्यार्थ्यांचा पहिला वर्ग सुरू झाला.
२००८ आणि २०१५ मध्ये माओवाद्यांनी प्राथमिक शाळा पाडली होती आणि २०२० मध्ये दोषी कार्यकर्त्यांनी शाळा पुन्हा बांधण्यासाठी पुढाकार घेतला होता. सोमवारी या माओवादी कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांचे फुलांचे हार देऊन स्वागत केले आणि त्यांना वर्गात बसवले. ही शाळा रायपूर पासून दक्षिणेला ३५० किमी अंतरावर असणाऱ्या भांसी, मसपरा या जंगलातील भागात आहे.
“सर्वात महत्त्वाचे म्हणजे सहा वर्षांपूर्वी ज्यांनी ही शाळा पाडली होती त्यांनीच शरण आल्यानंतर या शाळेचे बांधकाम केले आणि ते मुख्य प्रवाहात आले.” असे दंतेवाडाचे जिल्हाधिकारी दीपक सोनी म्हणाले. २०२० मध्ये माओवादी शरण आले होते; तेव्हा त्यांना तुम्ही काय करणार असे विचारण्यात आले असता, त्यांनी शाळेची पुनर्बांधणी करण्याची आणि त्यातूनच पहिली कमाई करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
हे ही वाचा:
आता ‘रवी’ कडून अपेक्षा ‘सुवर्ण’ किरणांची
जेंव्हा मोदी विरोधकांची आपसातच जुंपते….
कांस्य पदक विजेत्या लोवलिनाचे पंतप्रधानांकडून कौतूक
मनसुख हिरेनच्या हत्येसाठी दिली होती ४५ लाखांची सुपारी
प्रशासनाने या कामाला लगेच परवानगी दिली आणि दोन ऑगस्टला शाळेचा पहिला वर्ग भरला. शरण आलेले माओवादी आता आंगणवाडीचे बांधकाम आणि शाळेला जोडणाऱ्या रस्त्याचे काम करत आहेत.