‘अमेरिकेतील भारतीयांच्या मृत्यूमागे अनेक कारणे’

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण

‘अमेरिकेतील भारतीयांच्या मृत्यूमागे अनेक कारणे’

अमेरिकेमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा निषेध करून त्यांच्या मृत्यूमागे एक कारण नसून एकापेक्षा अधिक कारणे असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. तसेच, अलीकडील दोन विद्यार्थी मृत्यूंच्या प्रकरणांची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत भारतीय अधिकाऱ्यांनी अमेरिकेतील अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याचेही सांगण्यात आले.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते, रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी साप्ताहिक पत्रकार परिषदेला संबोधित करताना, अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांच्या दुर्दैवी मृत्यूवर प्रकाश टाकला. ‘दोघा भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूची चौकशी सुरू आहे. आम्ही वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधला असून त्यांनी शक्य ती सर्व मदत केली आहे. आशा आहे की, आम्हाला त्यांच्या मृत्यूंच्या कारणांबद्दल अधिक माहिती मिळेल,’ असे जयस्वाल म्हणाले.

जानेवारीपासून अमेरिकेत सुमारे १० भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती जयस्वाल यांनी दिली. ‘जानेवारीपासून, सुमारे १० भारतीय विद्यार्थी मरण पावले आहेत. त्यातील विवेक सैनीचा मृत्यू एका भटक्या व्यक्तीने केला. त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर एकावर गोळी झाडण्यात आली,’ असे जयस्वाल यांनी सांगितले.
या दोन्ही प्रकरणांचा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून तपास केला जात आहे. भारतीय वाणिज्य दूतावासाकडून तेथील विद्यार्थ्यांशी सातत्याने संपर्क ठेवला जात आहे. त्यांनी स्वत:ची काळजी कशी घ्यावी आणि वाणिज्य दूतावास त्यांना कशाप्रकारे मदत करू शकतात, हेदेखील सांगितले जात आहे, अशी माहिती जयस्वाल यांनी दिली.

या मृत्यूंमागे अनेक कारणे असल्याचे जयस्वाल यांनी स्पष्ट केले. हे सर्व मृत्यू एका कारणामुळे झालेले नाहीत तर यामागे अनेक कारणे आहेत, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले. कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंतेव्यतिरिक्त काही वेगळ्या समस्याही आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ‘न्याय आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या पलीकडे इतर अनेक समस्या आहेत, ज्याकडेदेखील लक्ष देणे आवश्यक आहे. काही मृत्यू आत्महत्या आणि इतर मानसिक आजाराशी संबंधित समस्यांमुळे घडल्या आहेत. म्हणूनच आम्ही विद्यार्थी समुदायापर्यंत पोहोचू इच्छितो आणि त्यांना सोई प्रदान करू इच्छितो, असे ते म्हणाले.

हेही वाचा :

लेबनानचा उत्तर इस्रायलवर रॉकेट हल्ला

मांस-मटन खाण्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांकडून ‘इंडी’ आघाडीच्या नेत्यांची पाठराखण

ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात गोळीबार; चार जण ठार

बंगळूरू कॅफे ब्लास्टमागील आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी

या आठवड्याच्या सुरुवातीला मूळचा हैदराबादचा मोहम्मद अब्दुल अरफाथ ओहायो येथे मृतावस्थेत सापडला. तो मार्चपासून बेपत्ता होता. त्याचे पार्थिव भारतात नेण्यासाठी शोकाकूल कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्यात येत असल्याचे जयस्वाल यांनी सांगतिले. तसेच, पुढील आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन भारतभेटीवर येत असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन आणि अमेरिकेचे उप परराष्ट्र मंत्री कर्ट कॅम्पबेल भारत दौऱ्यावर येणार आहेत.

Exit mobile version