अनेक कुलकर्णी मुंबई संघात येतील पण धवल कुलकर्णी सारखे कोणी नाही

धवल कुलकर्णीच्या निवृत्तीनंतर युवा खेळाडूंनी व्यक्त केल्या भावना

अनेक कुलकर्णी मुंबई संघात येतील पण धवल कुलकर्णी सारखे कोणी नाही

नुकतीच रणजी स्पर्धेचा अंतिम सामना गुरुवार, १४ मार्च रोजी पार पडला. मुंबई विरुद्ध विदर्भ सामन्यात मुंबई संघाने बाजी मारत रणजी ट्रॉफी आपल्या नावे केली. २०२३-२४ स्पर्धेच्या विजेतेपदावर मुंबई संघाने नाव कोरले आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईने विदर्भाला १६९ धावांनी पराभूत करत ४२ व्यांदा रणजी ट्रॉफीवर नाव कोरले. मुंबईचा गोलंदाज धवल कुलकर्णी याचा हा अखेरचा सामना होता. त्याच्या निवृत्तीनंतर मुंबई संघातील खेळाडूंनी त्याला मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई विरुद्ध विदर्भ हा रणजी सामना खेळल्यानंतर मुंबईचा गोलंदाज धवल कुलकर्णी याने निवृत्ती घेतली. ३६ वर्षीय धवल १६ वर्षे मुंबईकडून खेळला. त्यानंतर त्याच्या निवृत्तीबद्दल मुंबई संघातील खेळाडूंनी त्याला मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. याचा व्हिडिओही बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकूर आणि शम्स मुलानी हे धवलला शुभेच्छा देताना दिसत आहेत.

धवल कुलकर्णी हा संघातील महत्त्वाचा खेळाडू होता आणि त्याची उणीव संघात राहील. सेकंड इनिंगसाठी शुभेच्छा असं श्रेयस अय्यर याने म्हटलं आहे. शार्दुल ठाकरे याने भावना व्यक्त करत म्हटलं आहे की, धवल याच्यासोबत १२ वर्षे एकत्र खेळून खूप काही शिकायला मिळाले. तसेच त्याने धवल कुलकर्णी याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. पृथ्वी शॉ यानेही धवल कुलकर्णी याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक कुलकर्णी मुंबई संघात येतील पण धवल कुलकर्णी सारखे कोणी नाही, असं शम्स मुलानी म्हणाला आहे.

हे ही वाचा:

लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या होणार जाहीर!

सर्वेक्षणानुसार एनडीए ४०० पार करणार!

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबईतील रस्ते कामाचा दहावीच्या विद्यार्थ्यांना फटका!

धवल कुलकर्णी याने रणजी ट्रॉफी फायनल पूर्वीचं त्याचा अखेरचा सामना असल्याचं जाहीर केलं होतं. धवलने या अंतिम सामन्यात एकूण चार विकेट्स घेतल्या. धवल कुलकर्णी याने ९५ सामन्यांमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व केलं. धवलने या १५७ डावांमध्ये २८१ विकेट्स घेतल्या. धवलने १५ वेळा पाच विकेट्स घेतल्या. तसेच एक वेळा १० विकेट्स घेण्याची कामगिरीही केली. तसेच धवलने ११० डावात ८ अर्धशतकांसह १,७९३ धावा केल्या. धवलची ८७ ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.

Exit mobile version