काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत शिखांबाबत केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण केला आहे. राहुल गांधीनी आपल्या भाषणादरम्यान भारतातील शिखांच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधींच्या सभेत अनेक खलिस्तानी कट्टरपंथी उपस्थित होते. राहुल गांधींच्या विधानाला खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवंत पन्नूने पाठींबा दिला आहे. दरम्यान, राहुल गांधींच्या विधानावर भाजपने त्यांना आठवण करून देत, काँग्रेसच्या काळात देशात ३,००० शीख मारले गेल्याचे सांगितले.
मिडिया बातमीनुसार, खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवंत पन्नूने राहुल गांधींच्या विधानाचे समर्थन करणारे एक पत्र जारी केले. पत्रात म्हटले की, भारतातील शिखांच्या अस्तित्वाला धोका आहे. राहुल गांधींचे विधान केवळ धाडसीचे नाहीतर १९४७ पासून भारतात शिखांना ज्या परिस्थितीचा सामना करावा लागला आहे, त्याबाबत तथ्यही आहे. तसेच पंजाबच्या स्वातंत्र्याबाबत शीख फॉर जस्टिस (SFJ) च्या भूमिकेची पुष्टी करते. राहुल गांधींच्या सभेवेळी अनेक खलिस्तान समर्थक शीख देखील उपस्थित असल्याचे पत्रात म्हटले आहे.
हे ही वाचा :
मलायका अरोराच्या वडिलांनी इमारतीवरून उडी मारून केली आत्महत्या; कोण होते अनिल अरोरा?
शिमल्यात अवैध मशिदीविरोधात हिंदूंचा संताप, उग्र आंदोलन !
कालिंदी एक्स्प्रेस प्रकरणात नामचीन गुंड शाहरुखला अटक !
जगप्रसिद्ध चित्रकार एस.एच. रझा यांच्या कोट्यवधीच्या पेंटिंगची चोरी
राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपसह अनेकांकडून टीका करण्यात येत आहे. अनेक शीख नेत्यांनी देखील आक्षेप घेत राहुल गांधींवर टीका केली आहे. तसेच राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षणाच्या मुद्यावर भाष्य करून देखील नव्या वादाला तोंड फोडले आहे. काँग्रेस योग्य वेळ आल्यावर आरक्षण संपवण्याचा विचार करेल, असे राहुल गांधी म्हणाले होते. यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधींवर टीका करत, ‘जो पर्यंत भाजप आहे तो पर्यंत आरक्षणाला कोणीही हात लावू शकत नसल्याचे म्हटले आहे. तसेच देशविरोधी वक्तव्य करण्याची राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला सवय लागली असल्याचेही मंत्री शाह म्हणाले.