एकाच ऍपमधून रेल्वे तिकीट, टॅक्सी, हॉटेल बुक करता येणार

नव्या रेल्वे पॅसेंजर ऍपमध्ये एकाचवेळी अनेक सुविधांचा लाभ घेता येणार

एकाच ऍपमधून रेल्वे तिकीट, टॅक्सी, हॉटेल बुक करता येणार

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता दिलासा मिळणार आहे. नुरे भारत नेटवर्क (NuRe) आणि रेलटेल कडून एक नवे रेल्वे ऍप लाँच करण्यात आले आहे. PIPOnet असे या ऍपचे नाव आहे. नवीन रेल्वे प्रवासी ऍपचे उद्दिष्ट हे ई-तिकीटिंग सेवा, प्रवास, मुक्काम आरक्षण आणि मनोरंजन ऍप अशा सर्व सेवा प्रदान करणे हे असणार आहे. हे ऍप प्ले स्टोअरवर सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार आहे. या ऍप साठी रेलटेलने NuRe सोबत भागीदारी केली आहे.

या नव्या रेल्वे पॅसेंजर ऍपमध्ये एकाचवेळी अनेक सुविधांचा लाभ वापरकर्त्यांना घेता येणार आहे. या ऍपमध्ये ओला, उबर, नेटफ्लिक्स सारख्या ऍपसह अन्न मागवण्यासाठी, हॉटेल बुकिंगसाठी, तिकीट आरक्षित करण्यासाठी सुविधा असणार आहे. हे ऍप पुढील दोन आठवड्यात अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी प्ले स्टोरवर डाऊनलोडसाठी उपलब्ध करण्यात येईल. मात्र, आयओएस वापरकर्त्यांसाठी हे ऍप कधीपर्यंत उपलब्ध होईल, याची माहिती उपलब्ध झालेली नाही. जाहिरात देऊ इच्छित लोकांसाठी जागा ठेवण्यात आली आहे.

हे ही वाचा:

सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स प्रकरणांचा शिवकुमार यांना फटका?

सहा राज्यांमध्ये शंभरहून अधिक ठिकाणी एनआयएकडून छापेमारी

वर्षातून चार आठवडे मराठी चित्रपट दाखवले नाही तर १० लाखांचा दंड

मंत्रिपदाचं आमिष दाखवून आमदारांची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

“आम्ही नेटफ्लिक्स, उबेर, ओला ऍपसह अनेक सुविधा एकत्रित केल्या आहेत. PIPOnet द्वारे, प्रवासी ई-तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट, मुक्काम, जेवण आणि इतर अनेक गोष्टींचे आरक्षण करू शकतील. शिवाय जाहिरातदारांसाठीही जागा असणार आहे. या ऍपची व्याप्ती खूप मोठी आहे. येत्या पाच वर्षांत १ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे,” असे नुरे भारत नेटवर्कचे सीईओ कृष्णा म्हणाले.

Exit mobile version