विनेश फोगटला तिकीट दिल्याने अनेक काँग्रेस नेते नाराज !

बाहेरील ऐवजी स्थानिक नेत्यांना प्राधान्य देण्याची मागणी

विनेश फोगटला तिकीट दिल्याने अनेक काँग्रेस नेते नाराज !

कुस्तीपटू विनेश फोगटला जुलाना मतदारसंघातून विधानसभेचे तिकीट मिळाल्याने हरियाणा काँग्रेसमध्ये नाराजी आहे.  तिकीट न मिळाल्याने अनेक उमेदवारांनी विनेश फोगटच्या कार्यक्रमाला अनुपस्थिती दाखविल्याचीही माहिती आहे. याशिवाय तिकीट वाटपाबाबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC ) कार्यालयाबाहेरही निदर्शने करण्यात आली आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, विनेश फोगटच्या सन्मानासाठी बख्ता खेडा गावात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, जुलाना मतदारसंघातून तिकिटाचे दावेदार असणारे अनेक नेते या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. यामध्ये परमिंदर सिंह धूल, धर्मेंद्र धूल आणि रोहित दलालसह अनेक जणांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुलाना मतदारसंघातून विनेश फोगटला तिकीट दिल्याने हे नेते नाराज आहेत. स्थानिक नेत्यांना असे वाटत आहे की, त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करून बाहेरच्यांना तिकीट देण्यात आले आहे. फोगट यांच्या कार्यक्रमाला फार कमी लोकांनी हजेरी लावल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा : 

राहुल गांधींकडून देशाची प्रतिमा मलीन करण्याचे काम !

आंदोलन सोडा, दुर्गापूजेकडे लक्ष द्या…ममतांच्या वक्तव्यामुळे पीडितेच्या आईकडून संताप

७० किलो वजनाचे सिमेंटचे ब्लॉक टाकून मालगाडी उलटवण्याचा कट !

‘मुंबईच्या डबेवाल्या’ची कथा केरळच्या पाठ्यपुस्तकात !

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणातील काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी रविवारी (८ सप्टेंबर) भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली आणि बाहेरील ऐवजी स्थानिक नेत्यांना प्राधान्य देण्याची मागणी केली. नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट दिल्याने नाराजी व्यक्त करत, निदर्शने करण्यात आली. बहुतांश आंदोलक हरियाणातील बावनी खेडा येथील होते, ‘आम्ही बाहेरील उमेदवार खपवून घेणार नाही’, अशा मजकुराचे फलक त्यांच्या हातामध्ये होते. दरम्यान, हरियाणातील विधानसभेच्या ९० जागांसाठी एकाच टप्प्यात ५ ऑक्टोंबरला मतदान होणार असून ८ ऑक्टोंबरला मतमोजणी होणार आहे.

Exit mobile version