ओला या कंपनीने भारतीय बाजारपेठेत स्कुटर आणणार असल्याचे घोषित केले होते. ग्राहकांची ती प्रतिक्षा आता लवकरच समाप्त होणार आहे. या स्कुटर निर्मितीच्या कारखान्यासाठी आवश्यक त्या भांडवलासाठी कंपनीने बँक ऑफ बडोदाकडून १०० दशलक्ष डॉलरचे कर्ज घेतले आहे. ओला इलेक्ट्रीक या कंपनीमार्फत इलेक्ट्रिक स्कुटरच्या निर्मितीचे काम केले जाणार आहे.
ओला आपला इलेक्ट्रिक स्कुटरचा कारखाना तमिळनाडूमध्ये चालू करणार आहे. त्यासाठी कंपनीने २,४०० कोटी रुपयांची गुंतवणुक करण्याची घोषणा केली आहे. हा कारखाना ५०० एकर जागेवर बनवण्यात येणार आहे. या कारखान्यातून दरवर्षी १० दशलक्ष वाहनांचे उत्पादन करण्यात येणार आहे. कारखाना कार्यान्वित झाल्यानंतर २०२२ पर्यंत या कारखान्यातून जगातील १५ टक्के ई-स्कूटर तयार करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. त्याबरोबरच कंपनी या स्कूटरची निर्यात करण्याच्या देखील विचारात आहे.
हे ही वाचा:
नारायण राणेंची महत्वाच्या मंत्रिमंडळ समितीवर नियुक्ती
खडसेंसाठी महत्वाचा झोटिंग समितीचा अहवाल गहाळ
ठाकरे सरकार मेट्रो कारशेड कुठे बांधणार?
विजयी भव! पंतप्रधान साधणार भारताच्या ऑलिम्पिक चमूशी संवाद
या कारखान्याचे वैशिष्ट्य म्हणजे ओला इलेक्ट्रिकचा हा जगातील सर्वात मोठा कारखाना असणार असल्याचे बोलले जात आहे. ओला इलेक्ट्रिकचा कारखाना पूर्णत्वास येत असून लवकरच वाहनांचे उत्पादन सुरू होणार आहे.
या कारखान्यासाठी कंपनीने १० दशलक्ष डॉलर्सचे कर्ज उभे केले आहे. बँक ऑफ बडोदा आणि ओला इलेक्ट्रिक यांच्या दरम्यान झालेला हा करार भारताच्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील सर्वात दीर्घकालीन कर्जपुरवठा करार असल्याचे कळले आहे.